शनिवार, ऑगस्ट 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतःच्या मुलीचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं अन्…; रवींद्र महाजनींबाबत पत्नीचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “त्यामधून तिला सोडवलं आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 17, 2024 | 7:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ravindra Mahajani’s wife revealed that he was beating his daughter Rashmi in anger see the details

स्वतःच्या मुलीचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं अन्...; रवींद्र महाजनींबाबत पत्नीचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, "त्यामधून तिला सोडवलं आणि..."

लोकप्रिय मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या आकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यांच्या अकस्मात निधनावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र त्यांच्याबद्दलच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आता समोर येत आहेत. रवींद्र यांच्या पत्नी माधवी यांचं ‘चौथा अंक’ हे पुस्तक नुकतंच प्रदर्शित झालं असून या पुस्तकात त्यांनी रवींद्र यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच त्यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.

या पुस्तकात रवींद्र यांनी रागाच्या भरात त्यांची मुलगी रश्मीला मारले असल्याचे म्हटले आहे. माधवी यांनी हा प्रसंग सांगत असे म्हटले आहे की, “रवीला राग आला की तो उग्र रूप धारण करीत असे. प्रेमात आला की तो लाडही खूप करीत असे. एकदा तो रश्मीवर कशावरून तरी इतका चिडला की, त्याने रश्मीचं डोकं भितीवर जोरात आपटलं. तेव्हा तिला कशीतरी त्याच्या तडाख्यातून सोडवले. पण एकूण रवीच्या निष्ठुरपणे मारहाण करण्याच्या सवयीमुळे रश्मीच्या मनात त्याची भीती बसलेली होती.”

आणखी वाचा – १९ वर्षांचा संसार मोडला, एक मुलगी अन्…; घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने निवडला अध्यात्मचा मार्ग, आश्रमातील व्हिडीओ केला शेअर

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “एकदा आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो. रश्मी आतून पाण्याचा ग्लास घेऊन येत होती. अचानक तिच्या हातातून ग्लास निसटून खाली पडला. त्यामुळे तो ग्लास फुटला आणि त्याच्या काचा सर्वत्र विखुरल्या. ग्लास पडल्यामुळे बाबा रागावला तर या भीतीने ती धावत माझ्याकडे आली. पण वाटेत फुटलेल्या काचा होत्या, त्याचे तिला भान राहिले नाही. त्या काचा तिच्या पायात खोलपर्यंत घुसल्या. ताबडतोब तिला आम्ही डॉक्टरांकडे नेले. पाय हळूहळू बरा झाला; पण तिच्या मनातला धाक तसाच राहिला.”

आणखी वाचा – “बाळाच्या मानेला…”, देबिना-गुरमीतने मुलाला उलटं लटकवताच नेटकऱ्यानी सुनावलं, व्हिडीओ पाहून म्हणाले, “खेळणं नाही तुम्ही…”

यापुढे त्यांनी रवींद्रंचे कौतुकही केले आहे. त्यांचे कौतुक करत असे म्हटले की, “मूड असला की रवी आमचे लाडही करायचा. रश्मीला पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्याने तिला जरीचं परकर पोलकं, डोक्यावर मुकूट, कंबरपट्टा व फुलांचे दागिने असा सगळा थाट केला होता. रश्मी तेरा वर्षांची होईपर्यंत तिचा वाढदिवस तो लग्नासारखा साजरा करीत असे. मुलांना, नातेवाईकांना बोलवायचे, ह्या सर्वांवर पैसे खर्च करायचे. महागड्या हॉटेलमधे न्यायचा, भरपूर कपडे, खाण्यापिण्याची चंगळ अशी सगळी त्याची मनमानी चालत असे.”

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी मनोरंजनमराठी कलाकारमराठी बातमीमाधवी महाजनीरश्मी महाजनीरवींद्र महाजनीentertainment newsMadhavi Mahajanimarathi actorsMarathi Artistsmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsRashmi Mahajaniravindra mahajani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Titeeksha Tawde And Siddharth Bodke

मालिका, मैत्री, डेट अन्…; कोण आहे तितीक्षा तावडेचा होणारा नवरा?, 'दृश्यम'मध्येही केलं आहे काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.