‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगूरी भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. या मालिकेतून तिला खूपच लोकप्रियता मिळाली. शुभांगी गेल्या वर्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. शुभांगी पती पियुष पूरेपासून वेगळी झाली असून घटस्फोटाचा मार्ग न अवलंबता तिने अध्यात्माचा मार्ग निवडला आहे.
शुभांगी अत्रे गेल्या काही दिवसांपासून एकांतात वेळ घालवत आहे. ती गेले काही दिवस कोयंबटूरमधील योग व अध्यात्मिक आश्रमात होती. याचे काही व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “योग केंद्रात एक दिवस घालवल्यानंतरही खूप शांतता मिळते. आश्रम ही एक अशी शांत जागा आहे, जिथे मला ध्यानसाधना, योग करण्यात खूपच आनंद व समाधान मिळाले.”
आणखी वाचा – अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर खळबळ, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “अजून किती…”
यापुढे तिने असं म्हटलं की, “तिथल्या आध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक उर्जेचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव पडला आहे. तिथे घालवलेल्या माझ्या वेळेचा विचार करून, आत्म-शोधाच्या क्षणांसाठी मी खूप कृतज्ञ आहे. या कार्याचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान राहील.”
दरम्यान, अभिनेत्रीने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये तिने पलचीन बसूची भूमिका साकारली होती. यानंतर अभिनेत्रीने ‘कस्तुरी’ आणि ‘दो हंसों का जोडी’ सारख्या मालिकेमध्ये काम केलं आणि त्यानंतर ती ‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेमध्ये दिसली.