बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अनेक कारणांमुळे चर्चेत असते. २०१८ साली ती हॉलीवूड सिंगर निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. निक हा गायक असून त्याचे दोन्ही भाऊदेखील गायक आहे. प्रियांकाच्या सासरी सर्व मंडळी हे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. निकचा भाऊ जो जोनस व अभिनेत्री सोफी टर्नर यांच्या घटस्फोटामुळे चांगलेच चर्चेत आले होते. अशातच सोफीने जो व तिच्या नात्यावर भाष्य केले आहे. यामध्ये तिने जोनास कुटुंबामुळे बाहेर कशाप्रकारे वागणूक दिली याबद्दल सांगितले आहे. (sophie turner on relationship)
‘गेम ऑफ थ्रोन्स’ या चित्रपटामुळे सोफी टर्नर अधिक प्रकाशझोतात आली. तिने नुकतीच ‘ब्रिटिश वोग’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने सांगितले की, “तीन भाऊ व त्यांच्या पत्नीवर अधिक लक्ष दिले जाते. आम्हाला नेहमी त्यांची पत्नी म्हणूनच ओळखले जात असे. मला हे अजिबात आवडत नसे. आम्ही फक्त त्यांच्याबरोबर आहोत अशी भावना येते”.

पुढे ती म्हणाली की, “जो माझ्याशी खूप व्यवस्थित वागायचा. त्याला या सर्वाबद्दल काहीही वाटत नसे. त्याने मला कधीही काहीही वाटू दिलं नाही. आम्हाला म्हणजे प्रियांका, मी व केविनची पत्नी डेनियलला बॅंड चालवणारेच समजत असत”.सोफी नेहमी जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेली दिसते. चाहते त्यांना जे-सिस्टर्स म्हणून ओळखले जात होते. ‘जोनास ब्रदर्स’ यांच्या ‘सकर’ या अल्बममध्येही सोफी, प्रियांका व डेनियल यांनीही काम केले आहे.
सोफी व जो यांनी २०२३ साली घटस्फोट घेतला. वेगळे होण्याची घोषणा केल्यानंतर सोफीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता ज्यामध्ये ती पार्टी करताना दिसली. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी खूप टिका करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मुलींना एकटे सोडून पार्टी करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले होते. सोफी व जो यांचे २०१९ साली लग्न झाले होते. २०२० साली दोघांना पहिली मुलगी झाली. २०२२ साली त्यांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पण नन्यत्र काही कारणांमुळे दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्याने २०२३ साली जो ने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. आता दोघेही वेगळे झाले आहेत.