मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, अमेरिकेला जाणार होते पण…

Saurabh Moreby Saurabh More
मे 17, 2024 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Karthik Aaryan's uncle and aunt dies in Mumbai ghatkopar hoarding incident

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, अमेरिकेला जाणार होते पण...

१३ मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर याठिकाणी होर्डिंगची घटना घडली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून १४ ते १५ जण या घटनेत मृत्यूमुखीदेखील पडले. या दुर्घटनेत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा ही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे अपघातानंतर सुमारे ५६ तासांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले कार्तिक आर्यनचे मामा-मामी हे इंदूर विमानतळाचे माजी संचालक मनोज चांसोरिया व त्यांची पत्नी अनिता चांसोरिया मरियम चौक, सिव्हिल लाईन्स, जबलपूर येथे राहत होते.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य त्यांच्या कारने मुंबईला गेले होते. सोमवारी ते जबलपूरला परतत होते. यावेळी ते पेट्रोल भरण्यासाठी ती घटना घडलेल्या पेट्रोल पंपावर थांबले होते आणि होर्डिंग पडलेल्या त्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ‘न्यूज १८’ला मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनोज चांसोरिया आणि त्याची पत्नी अनिता चांसोरिया हे रविवारी त्यांचा मुलगा यशला भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार होते, तो व्हिसा काढण्यासाठी मुंबईला गेला होता, मात्र यशचे आई-वडिलांशी बोलणे होऊ शकले नाही.

आणखी वाचा – Video : …अन् ‘ती’ बातमी कळताच कार्तिकी गाडकवाडची सासू आनंदाने उड्या मारु लागली, आई झाल्यानंतर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

त्यानंतर सोमवारी मुंबईत घडलेल्या होर्डिंगच्या त्या घटनेत त्याचे आई-वडीलही अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून त्याला समजले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१५ मे) घटनास्थळी पोलिसांना ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह सापडले. मृतदेह तीन दिवस ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. शेवटी मुलाने अंगठी व अंगावरील दागिन्यांवरून आई-वडिलांची ओळख पटवली. त्यानंतर काल (१६ मे गुरुवार) मुंबईत मृत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी वाचा – लग्नाच्या १३ वर्षांनंतर घटस्फोट आता आमिर खानचा भाचा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात, गर्लफ्रेंडबरोबरच्या रोमँटिक फोटोने वेधलं लक्ष

दरम्यान, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आर्यनच्या मामा-मामीच्या मृत्यूमुखी पडल्याच्या वृत्ताने अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या वृत्तावर अनेकांनी शोक व्यक्त केला असून अनेकांनी याबद्दल सोशल मीडियाद्वारे दु:खही व्यक्त केले आहे.      

Tags: bollywood actorGhatkopar Hoarding AccidentKarthik Aryan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Shreya Bugade and Bhau Kadam

'चला हवा येऊ द्या' सोडल्यानंतर भाऊ कदम व श्रेया बुगडे एकमेकांच्या भेटीला, दोघांचाही एकत्रित लंडन प्रवास, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.