शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईच वैरी कशी?, सावत्र मुलीचे रुपाली गांगुलीवर सतत गंभीर आरोप, म्हणाली, “तिच्याबरोबर असुरक्षित…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 11, 2024 | 12:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rupali ganguly step daughter

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीच्या मुलीचे गंभीर आरोप

‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली एका नव्या वादात अडकली आलं आहे. तिची सावत्र मुलगी ईशा वर्माची चार वर्ष जुनी पोस्ट व्हायरल झाली ज्यामध्ये अभिनेत्रीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ईशाने दावा केला होता की जेव्हाही तिने अश्विन वर्माशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिनेत्रीने तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. आता एका मुलाखतीत तिने काही नवे धक्कादायक दावे केले आहेत. रुपालीने ईशाच्या आरोपांवर अद्याप काही भाष्य केले नाहीत. मात्र तिचा पती अश्विनने ईशाचे दावे फेटाळून लावले आहेत. अशातच आता ईशाचा एक नवा व्हिडीओ अधिक चर्चेत आला आहे. (rupali ganguly step daughter)

ईशाने हा व्हिडीओ शेअर करत, रुपालीबरोबर सुरक्षित नसल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिचे दु:ख पूर्णपणे दिसून येत आहे. तसेच तिने या व्हिडीओमध्ये रुपालीच्या मुलाचीदेखील माफी मागितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत ईशा म्हणाली की, “मी आता २६ वर्षांची झाले आहे. पण सगळ्या आठवणी आजही माझ्यासोबत आहेत. या सर्व घटना जरी  भूतकाळात झाल्या असल्या तरीही त्या भविष्यात व वर्तमानात खूप त्रास देतात. मला त्रास देणाऱ्यांना मी उत्तर द्यायचे ठरवले. अशा लोकांनी माझ्या आईला खूप त्रास दिला, ज्यांच्यावर मी खूप प्रेम करते आणि मलादेखील खूप त्रास दिला”.

आणखी वाचा – “कुणाची मनं दुखावली असतील तर…”, सूरज चव्हाणने मागितली माफी, जान्हवी-अंकिता यांचा उल्लेख करत म्हणाला, “यापुढे मी स्वतः …”

View this post on Instagram

A post shared by Esha Verma (@eshav.official)

पुढे ईशाने सांगितले की, “त्यांनी मला निवडले नाही. त्यांनी मला सोडले, माझा अपमान केला आणि माझ्या असुरक्षिततेच्या चर्चा केल्या. या सगळ्यामुळे मी माझ्याबद्दल कधीही चांगला विचार करु शकले नाही. त्यांनी माझी कधीही माफी मागीतली नाही. माझ्या वडिलांची प्रतिक्रिया पाहून मला धक्का बसला. त्यांनी देखील माझ्या मानसिक स्थितीची मस्करी केली. माझ्या वडिलांनी मला कधीही पाठिंबा दिला नाही. माझ्यासाठी हे खूप धक्कादायक होते”.

आणखी वाचा – मित्राच्या मुलीचा जीव धोक्यात, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं मदतीचं आवाहन, पोस्ट व्हायरल

यानंतर तिने रुपालीचा मुलगा रुद्रांक्षबद्दलदेखील भाष्य केले आहे, “ती म्हणाली की, “या सगळ्यामुळे जर कोणाला त्रास झाला तर मी माफी मागते. काही ठिकाणी खूप काही चुकीचं समोर आलं आहे जे मी आता सुधारू शकत नाही. रुद्रांश मी तुझ्यावर खूप प्रेम करते. बाबा तुझ्याशी तरी प्रेमाने वागत असतील अशी अपेक्षा आहे. पण माझा त्यांच्याबाबतीत असणारा अनुभव खूप वेगळा आहे”.

पुढे ईशा म्हणाली की, “आम्ही तिघं भावंडं एकत्र मोठे झालो आहोत. पण आमच्या तिघांचा एकत्रितपणे एकही फोटो नाही. आम्हाला एकत्र आणणं ही वडिलांची जबाबदारी होती. पण त्यांनी हे कधीही केले नाही. मला वडिलांनी बोलू दिलं नाही. तसेच मी रुपालीबरोबर सुरक्षिततेची भावना आली नाही. मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही माझी कधीही बाजू घेतली नाही. मला वडिलांप्रमाणे मोठी निर्माती व दिग्दर्शिका होण्याची इच्छा होती पण मला त्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही”. दरम्यान आता या प्रकरणाला कोणतं वळण लागणार? हे पाहण्यासारखं आहे.  

Tags: Rupali gangulystep daughterviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bollywood and Marathi actor Riteish Deshmukh give speech for brother Dheeraj assembly election campaign video viral on social media.

Video : भावासाठी रितेश देशमुख प्रचाराच्या रिंगणात, झापूक झुपूक स्टाइलने केलं भाषण, उपस्थितांच्या टाळ्या, शिट्ट्या अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.