मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘वेड’ चित्रपटातील जिनिलीयाच्या अभिनयाने तिने साऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. काही काळ सिनेसृष्टीपासून जिनिलियाने ब्रेक घेतला होता, ‘वेड’ चित्रपटातून तिने बऱ्याच कालावधीनंतर पदार्पण केलं. जिनिलीयाने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. (Genelia D’Souza Birthday)
रितेश आणि जिनिलीया हे बॉलिवूड कपलपैकी एक आहेत. दोघेही सोशल मीडियावर प्रसिद्ध असून नेहमीच काही ना काही हटके शेअर करून चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. २०१२ मध्ये रितेश आणि जिनिलीया विवाहबंधनात अडकले, लग्नाआधी ते बराच काळ एकमेकांना डेटही करत होते. रितेश सोबत लग्न केल्यानंतर जिनिलीयाने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला, यावर अनेक प्रश्न उपस्थित कऱण्यात आले.
पाहा जिनिलीयाचं एका रात्रीत नशीब कसं बदललं (Genelia D’Souza Birthday)

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलीयाने एकत्र काम केलं. जिनिलीयाची या चित्रपटातून खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात झाली. जिनिलीया तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. सिनेमाविश्वात काम करत असताना जिनिलीयाला सुरुवातीच्या काळात काही स्ट्रगल काही चुकला नाही. सिनेमांमध्ये काम करण्यासाठी तिलाही ऑडिशन्स हे द्यावेच लागले होते. असाच एक ऑडिशनचा किस्सा जिनिलीयाने एका मुलाखतीत सांगितला आहे. आज जिनिलीयाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया हा खास किस्सा.
जिनिलीयाने ऑडिशनचा किस्सा सांगत म्हटलं होत की, “‘जाने तू या जाने ना…’ या चित्रपटाची ऑफर मला खूप आधी मिळाली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी ही ऑफर पुन्हा माझ्याकडे आली. त्यापूर्वी या चित्रपटासाठी ३०० – ४०० मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. जेव्हा कोणीच मिळत नाही त्यावेळी माझी पुन्हा एकदा स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि या चित्रपटातील अदितीच्या भूमिकेसाठी मला फायनल करण्यात आले.”
या चित्रपटात इम्रान खान आणि जिनिलीयाची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.