मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून गौतमी देशपांडे हिला ओळखले जाते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेंची बहीण असलेली गौतमी अनेक नाटक व मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘माझा होशील ना’ या मालिकेतून. अभिनेत्री गौतमी देशपांडेची ही पहिलीच मालिका, पण त्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले होते. व त्यातूनच गौतमीला विशेष ओळख मिळाली आहे. गौतमी देशपांडे सध्या छोट्या पडद्यावर फारशी दिसत नसली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या फोटोज व व्हिडिओजची नेहमीच चर्चा होत राहते. शिवाय, ती अनेकदा विविध मुद्द्यांवर बिनधास्तपणे व्यक्त होत असते. (Gautami Deshpande)
अशातच गौतमीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तिने ट्रॅफिक सिग्नल तोडणाऱ्या पुण्यातील बसचालकांवर संताप व्यक्त करताना स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – “मरा सिगारेट पिऊन” ‘त्या’ कृतीनंतर जेव्हा भार्गवी चिरमुलेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाली, “सिगारेट तोंडात घेऊन…”
अभिनेत्री गौतमी देशपांडेने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला असून ज्यात ती एका कारमधून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गौतमी म्हणते, “मी आता ५ मिनिटांपूर्वी पुण्यातील मुकुंद नगर म्हणजे ज्याला आपण लक्ष्मी नारायण चौक म्हणतो, तिथून दरवेळेला जेव्हा जेव्हा मी इथून पास होते, तेव्हा मला कुठल्या ना कुठल्या मोठ्या गाड्या, पीएमटी किंवा ट्रॅव्हल्सच्या बसेस या नेहमीच ट्राफिक सिग्नल तोडताना दिसतात.”
हे देखील वाचा – “टोमणे ऐकून…” रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर सूनेची पहिली पोस्ट, गश्मीरचा फोटो शेअर करत म्हणाली, “त्या व्यक्तीची…”
“मला माहित नाही, की तिथे ट्रॅफिक पोलीस आहेत की नाही. पण जर तिथे नसतील तर कृपया तिथे असावे, अशी इच्छा आहे. कारण इतक्या मोठ्या गाड्या, पीएमटी बसेस जेव्हा रोज प्रत्येक सिग्नल तोडत असतात. तेव्हा असं होतं की, जेव्हा सरकारी गाड्यांनी एवढे सिग्नल्स तोडलेत तर काय ! आणि समोरून एवढ्या मोठ्या गाड्या येत असताना तुम्हाला काही इलाजही नसतो, कधीतरी सिग्नल चालू असताना तुम्हाला थांबावं लागतं. त्यामुळे कृपया याच्याकडे लक्ष दिलं जावं. तिथं सीसीटीव्ही बसवा आणि पाहा, किती लोक सिग्नल तोडतात.”, असं म्हणत गौतमीने पुणे ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलं आहे. (Gautami Deshpande angry on Pune Bus Drivers)