ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कलाविश्वाला दुःखद धक्का बसला. तळेगाव येथील एका इमारतीमध्ये रवींद्र महाजनी एकटेच राहत होते. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं पोलिस तपासणीमधून समोर आलं. या संपूर्ण प्रकारानंतर रवींद्र महाजनींचा मुलगा व सुप्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं. तसेच वडिलांची तुला काळजी नाही का? तू असं कसं वागू शकतो? असे अनेक प्रश्न गश्मीरला विचारण्यात आले. मात्र या सगळ्या प्रश्नांना गश्मीर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देत आहे.
रवींद्र महाजनी तळेगावमध्ये एकटेच राहत होते. गश्मीरची आई त्याच्याबरोबर राहत होती. निधनापूर्वी ते काही काळ आजारी होते. कुटुंबियांना रवींद्र महाजनी यांची काळजी नव्हती का? अशाही बऱ्याच चर्चा रंगाताना दिसल्या. मात्र या सगळ्या चर्चांमुळे महाजनी कुटुंबियांना बराच त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियाद्वारे गश्मीर सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगबाबत व्यक्त होत आहे. त्याचबरोबरीने गश्मीरच्या पत्नीनेही आता एक फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – Video : अंकिता लोखंडेनेच दिला वडिलांना खांदा, अभिनेत्रीची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले
गश्मीरची पत्नी गौरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये गश्मीर पुजा करताना दिसत आहे. गश्मीरच्या पाठिमागे त्याच्या वडिलांचा फोटो आहे. तसेच फोटो शेअर करत असताना गौरीने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “’टोमणे ऐकून त्यामध्येच होरपळून निघालेल्या व्यक्तीची राख होत नाही तर त्याचं सोनं बनतं”.
तसेच गश्मीरची पत्नी असल्याचा अभिमान आहे असंही गौरीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौरीच्या या पोस्टवर काही कलाकार मंडळींनीही कमेंट केली आहे. गश्मीर व गौरीची मैत्रीण अभिनेत्री पूजा सावंतनेही या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. तर अनेकांनी दोघांना प्रत्येक प्रसंगामधू बाहेर पडण्याची ताकद मिळो असं म्हटलं आहे.