अक्षय कुमार सध्या ‘OMG २’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसह चित्रपट समिक्षकांनीही ‘OMG २’चं कौतुक केलं आहे. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनीही अक्षयच्या या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. आता शरद पोंक्षे यांनी अक्षयच्या या चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केली आहे.(Marathi Actor Sharad Ponkshe Post On OMG2)
मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनीही हा चित्रपट पाहिला. त्यांनी या चित्रपटाबाबत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी या चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत त्यांनी चित्रपटाचं कौतुक केलं. “प्रत्येकाने आवश्य पाहावा असा सिनेमा” असं म्हणत त्यांनी सगळ्यांना हा चित्रपट पाहण्याचा आग्रह केला आहे.
शरद पोंक्षे सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे तर काहींनी चित्रपटाला विरोधही केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “सगळ्यांनी OMG चित्रपटाचा पहिला भाग पहावा आणि काही लोक नुसतं धर्माच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल करतात अश्या लोकांना त्यांची खरी जागा दाखवणारा चित्रपट आहे”.
तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “सनातनी असल्याचा अभिमान आहे. या चित्रपटातून जो विषय मांडला आहे तो खरच खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे. असा विषय मांडण्यासाठी फक्त आणि फक्त हिंदू धर्माचा, ग्रंथाचा असारा घेतला कारण सनातन धर्म प्राचीन तर आहेच पण प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे. हा गंभीर विषय मांडताना इतर धर्माचा कुठेही आधार नाही घेतला जसा OMG चित्रपटात घेतला गेला होता” अशी त्याने कमेंट केली आहे. त्यावर शरद पोंक्षेंनी देखील ‘अगदी बरोबर’ म्हणत त्याच्या कमेंटवर सहमती दर्शवली आहे. पंकज त्रिपाठी व अभिनेत्री यामी गौतमही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.