शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंकिता लोखंडेनेच दिला वडिलांना खांदा, अभिनेत्रीची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 14, 2023 | 10:29 am
in Trending
Reading Time: 7 mins read
google-news
Ankita Lokhande Father Death

Ankita Lokhande Father Death

Ankita Lokhande Father Death : ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्याकडून एक दुःखद घटना समोर आली आहे. या अभिनेत्रीच्या डोक्यावरील वडिलांच छत्र हरपलं असल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी (१२ ऑगस्ट) रोजी अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार अंकिताचे वडील बऱ्याच काळापासून आजारी होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकिताच्या वडिलांवर आज (१३ ऑगस्ट)रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेवटच्या दर्शनासाठी अभिनेत्रींच्या वडिलांचे पार्थिव तिच्या राहत्या घरी दाखल झाले.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

त्यांच्या पार्थिवावर काही वेळातच ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. वडिलांच्या मृत्यूने अंकिता खूपच खचलेली आहे. अंकिताच्या वडिलांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना अंकिताने त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी प्रार्थना केली आहे. अभिनेत्रीचे वडील शशिकांत लोखंडे यांना अखेरचा निरोप देत असताना उपस्थितांना अश्रु अनावर झाले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांचाही अश्रूंचा बांध फुटला. वडिलांचं पार्थिव पाहताच मुलगी अंकिता हिला अश्रू अनावर झाले. अभिनेत्रीची अवस्था पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आलं. त्याचबरोबरीने अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या वडिलांना खांदा दिला.

हे देखील वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांना मोठा दुःखद धक्का

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

वडिलांचे पार्थिव घेऊन जात असताना अंकिता सोबत तिला तिचा पती विकी जैन याने आधार दिला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती खूप खचलेली दिसत आहे, शिवाय तिला अश्रूही अनावर होत आहेत. अंकिता लोखंडेचं तिच्या वडिलांवर अधिक प्रेम होत, फादर्स डेनिमित्त तिने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by Bollywood (@bollywood.mobi)

शशिकांत लोखंडे यांच्या अचानक जाण्याचे संपूर्ण कुटुंबियांना दुःखद धक्का बसला आहे. अंकिताचे वडील बँकर होते. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या अंकिताला तिच्या आई-वडिलांनी कलाक्षेत्रात काम करण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन दिलं. शिवाय तिच्या खासगी आयुष्यात घडत असलेल्या प्रसंगांनाही सामोरं जाण्याची ताकद अंकिताला तिच्या वडिलांकडून मिळाली.

Tags: ankita lokhandeankita lokhande father deathvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
Next Post
Konkona sen on Ramayan Mahabharat

"…म्हणून मला माझ्या आईने रामायण, महाभारत पाहू दिलं नाही", कोंकणा सेनने केला खुलासा, म्हणाली, "आई माझ्याशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.