राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’, ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’, ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’, ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’, ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचा यात समावेश आहे. हे पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी प्रदान केले जातात. त्यातील एक महत्त्वाचा २०२३चा ‘गानसमाज्ञी लता मंगेशकर’ हा पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत शनिवारी घोषणा केली. (Gaansamragyi lata mangeshkar award announced to suresh wadkar)
सुधीर मुनगंटीवर यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचं सांगितलंं. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रामध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असून राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर त्यांनी इतर पुरस्कारांचीही घोषणा केली.
‘गान समाज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हा त्यांनी आजवर दिलेल्या संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण व अमूल्य योगदानासाठी घोषित करण्यात आला आहे. तसेच ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२३’ पं. शशिकांत श्रीधर मुळ्ये यांना घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केलं व शास्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
आणखी वाचा – अमृता खानविलकरसाठी राज ठाकरेंकडून दिवाळीची खास भेट, गिफ्टमध्ये नक्की काय?
‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२३’साठी अशोक समेळ यांच नाव घोषित करण्यात आला आहे. ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२३’ पुरस्कार ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिले आहे अशा कलाकारांना प्रदान केला जातो यावर्षी नयना आपटे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांस्कृतिक कार्य संचालनामार्फत देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा करताना या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून आणखी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.