छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमाच्या यादीत अग्रेसर असणारा आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने तर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची आज वेगळी अशी ओळख आहे. अभिनेता समीर चौघुलेंपासून ते दत्तू मोरे यांच्यापर्यंत प्रत्येकाचा वेगळा असा अंदाज आहे. त्यामुळे हे प्रत्येकजण त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीचं प्रत्येक पात्र खूप हटके असतं. त्यामुळे ती प्रेक्षकांना बरीच आवडते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त विविध फोटो, व्हिडीओ ही ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांकडून बरंच प्रेम मिळत असतं. पण नुकत्याच तिने शेअर केलेल्या फोटोंवर एका नेटकऱ्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवला. त्याचा स्क्रिनशॉट प्रियदर्शनीने इन्स्टाग्रामवर शेअर करत सोशल मीडियावरील अशा तुच्छ लोकांवरील पडदा उघड केला.(priyadarshini indalkar get offensive message from users)
नुकतंच प्रियदर्शनीने एक पांढऱ्या कोटमधील लूकमध्ये फोटोशूट केला होता. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर एक युझरने अतिशय वाईट मॅसेज केला त्यामुळे ती चांगलीच भडकली आहे. त्यात तिला त्या युझरने “हॉटनेस दाखव की, … पांढऱ्या ड्रेसशिवाय तुझा काळ्या ट्रेसमधील …”, असे मॅसेज केले होते.
त्या मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत प्रियदर्शिनीने लिहीलं, ‘“अर्थात अशा कमेंट्स, मेसेज येणार फोटो टाकतानाच कळायला पाहिजे”, अनेक पुरुष अशा फोटोजवर खूप ग्रेसफुली कमेंट करतात. एखादा फोटो हॉट वाटणं व ते व्यक्त करणं ही गोष्ट चुकीची नाही. पण, अशा पद्धतीने मॅसेज नक्कीच चुकीचे आहेत व ते दुर्लक्ष करत राहिले तर हे नॉर्मलाइल होईल. म्हणून हे सगळं लिहिते आहे. आणि या वरच्या फोटोंचा काही संबंध नसतानाही असे अनेक मॅसेज, अनेक मुलींना येत असतात. काही प्रमाणात मुलांनाही येतात. तर या सोशल मीडियाच्या निनावी जनतेला तसं तर आपण काही करु शकत नाही, फक्त आपल्या बाबतीत रिपोर्ट करु शकतो’.

ती पुढे लिहीते, ‘मी याबद्दल स्वतःला खरोखर भाग्यवान समजते कारण मला तुलनेने इन्स्टाग्राम परिवाराकडून खूप सकारात्मक प्रेम मिळालं आहे’. तिच्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर बऱ्याच व्हायरल होत आहे. तिने चाहत्यांना आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं अकाउंट रिपोर्ट करण्याची विनंती केली आहे.