बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आई-बाबा, सासु-सासऱ्यांची कॅरम स्पर्धा अन्…; प्रार्थना बेहेरेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “हिच माझी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 12, 2023 | 10:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prarthana behere share a video of carom game

prarthana behere share a video of carom game

संपूर्ण देशभरात सध्या दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी सण म्हटला की दिव्यांचा प्रकाश, आकाशकंदीलांच्या रांगा आणि गोडाधोडाचे पदार्थ यांचा मेळ जमतो. या दिवशी प्रत्येकाच्या घरी कुटुंब एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतं. प्रत्येकाच्या घरात पाहुण्यांची रेलचेल, भेटवस्तूंची देवाणघेवाण अशा प्रकारे सगळ्यांना आनंद वाटत मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. दिवाळी सणाची विशेषतः म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजय होय त्यामुळेचा आपल्याला सगळीकडे दिव्याची रोषणाई पाहायला मिळते.(prarthana behere share a video of carom game)

देशभरात हा सण विविध पद्धतीने, परंपरेने साजरा केला जातो. तसंच मनोरंजनसृष्टीतही हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्याही घरी दिवाळी अगदी वेगळ्या पद्धतीत साजरी केली जात आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या दिवाळी सणाच्या साजरीकरणाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या घराचा हॉल दिसत आहे. जिथे कॅरमचा डाव मांडला गेला आहे. तर दुसऱ्याबाजूला टिव्ही चालू आहे. टिव्हीवर सध्या सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३चा सामना सुरु असताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

आणखी वाचा – ब्रेकअप झालं तरीही सारा अली खानच्या घरी पार्टीसाठी पोहोचला कार्तिक आर्यन, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

एकीकडे क्रिकेटचा हा डाव रंगत असताना दुसरीकडे प्रार्थनाच्या घरात तिच्या आई-बाबा, सासु-सासऱ्यांमध्ये कॅरमचा डाव रंगात आला आहे. या व्हिडीओला तिने दिलेली ‘हॅपी दिवाली’ या गाण्याची जोड व्हिडीओला आणखीनच खास बनवते. हा व्हिडीओ पोस्ट करत प्रार्थनाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘हिच माझी दिवाळी! माझा खरा आनंद..!’, असं लिहीलं आहे. तिने या व्हिडीओला छोटं पण खूप गोडं कॅप्शन देत हा व्हिडीओचं छान वर्णन केलं आहे. प्रार्थनाने व्हिडीओ शेअर करत त्यांच्याकडे दिवाळी सणाचं होत असलेलं जल्लोषातील सादरीकरण सगळ्यांबरोबर शेअर केलं आहे.

आणखी वाचा – ‘जवान’ फेम अभिनेत्री नयनतारा संतापली, शाहरुख खान व दीपिका पदुकोणलाच सगळं श्रेय मिळाल्याने घेतला मोठा निर्णय

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक, कमेंटचा वर्षाव केला आहे. कलाकार मंडळींनीही या व्हिडीओवर इमोजी पाठवत आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री पूजा सावंतनेही डोळ्यातून येणाऱ्या हार्टचा इमोजी पाठवले आहेत. एका नेटकऱ्याने ‘खूप गोड क्षण’ असं लिहीत कमेंट केली आहे.

Tags: Diwali enjoyingmarathi actressprarthana behere
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Gaansamragyi lata mangeshkar award announced to suresh wadkar

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर; सांस्कृतिक विभागाच्या इतर पुरस्कारांचीही घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.