प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिचे सासरे आणि भारताचे माजी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात अभिनेता अंगद बेदी, सून नेहा धुपिया व नातवंडं आहेत. विशेष म्हणजे, ते मुलासह एका चित्रपटातही झळकले होते. त्यांच्या जाण्याने क्रिकेटसह बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. (Neha Dhupia father-in-law Bishan singh Bedi passed Away)
२५ सप्टेंबर १९४६ रोजी अमृतसर येथे बिशन सिंग बेदी यांचा जन्म झाला. १९६६ ते १९७९ या कालावधीत त्यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी २६६ विकेट्स घेतले होते. तर २२ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी १० वनडे सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं, ज्यात त्यांनी ७ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, भारताला पहिलावहिला वनडे सामन्यात विजय मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांचं नाव त्याकाळातील महान गोलंदाजांमध्ये गणलं जात होते. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षकाही भूमिकादेखील बजावली आहेत.
हे देखील वाचा – ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर दणक्यात साजरा झाला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा प्रवास ऐकून कलाकारांनाही अश्रू अनावर
बिशन सिंह बेदी यांनी एका बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या घूमर ते दिसले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटात त्यांचा मुलगा अंगद हा महत्वाच्या भूमिकेत झळकला होता. दरम्यान, आपल्या वडिलांबरोबर चित्रपटात एकत्र काम करण्याबद्दल विचारलं असता वडिलांसह चित्रपटात एकत्र काम करणं, हे माझ्यासाठी एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. ते महान क्रिकेटपटू तर होतेच, शिवाय ते चांगले माणूसही आहेत. अश्या या अप्रतिम चित्रपटात वडिल दिसणार असून मी यासाठी उत्सुक असल्याचे तो त्यावेळी म्हणाला होता.
हे देखील वाचा – अवाढव्य खर्च, आकर्षक सजावट अन्…; सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकने आशना श्रॉफबरोबर धुमधडाक्यात उरकला साखरपुडा, लिपकिस करतानाचे फोटो व्हायरल
त्याचबरोबर तो त्याच्या वडिलांचे अनेक फोटोज व व्हिडीओज चाहत्यांसमोर शेअर करत राहायचा. इतकंच नव्हे, तर सून नेहा धुपियाबरोबर बिशन सिंग बेदी यांचं चांगलं बॉण्डिंग होतं. दरम्यान, त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कलाकारांसह अनेक नामवंतांनी त्यांचे सांत्वन केले.