शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 8, 2025 | 10:00 am
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
Dipika Kakkar  liver cancer know its Symptoms 

चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

Dipika Kakkar  liver cancer know its Symptoms  : ‘ससुराल सिमर का’ मालिकेमुळे नावारुपाला आलेली दीपिका कक्कर सध्या तिच्या आजारपणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका व तिचा पती शोएब इब्राहिमने सगळ्यांसमोर दीपिकाच्या आजारपणाचा खुलासा केला. दीपिकाला लिव्हरचा कर्करोग झाला असल्याचं समोर आलं. तपासण्यांमधून हे समोर आलं. या बातमीने तिच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला. इतकंच नाही तर चाहत्यांमध्येही काळजीच वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं. अभिनेत्रीला दुसऱ्या टप्प्यातील लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. विशेष म्हणजे, तिने कोणतीही वाईट सवय जसे की मद्यपान किंवा धूम्रपान केलं नसतानाही तिला या आजाराशी लढा द्यावा लागत आहे. अर्थात, रोजच्या आयुष्यातील वाईट सवयी या गंभीर आजाराला निमंत्रण देत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम करु शकतात.

लक्षणांकडे दुर्लक्ष करणं घातक
बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला वेदना जाणवणे, पोट फुगणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, वजनात झपाट्याने कमी होणे ही सामान्य वाटणारी पण गंभीर लक्षणं आहेत. तर त्वचा व डोळे पिवळसर होणे (कावीळ), गडद रंगाची लघवी आणि थकवा हे देखील लिव्हर कॅन्सरचे गंभीर इशारे असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास निदान उशिरा होईल अन्यथा उपचार घेणं कठीण होऊन बसेल.

आणखी वाचा – सावधान! महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांचा मृत्यू तर…; लस घेऊनही आजार का होतो?

खाद्यपदार्थ शिजवण्याच्या चुकीच्या सवयी
लिव्हर कॅन्सरला मुख्यत्वे अन्न शिजवण्याची पद्धतची कारणीभूत ठरते. विशेषतः जास्त तापमानावर मांस शिजवणं, ग्रिल, बार्बीक्यू किंवा डीप फ्राय या पद्धतींमुळे ‘PAHs’, ‘HCAs’ नावाचे कर्करोगजन्य रसायने शरीरात तयार होतात आणि आपल्या वाईट पेंशीवर परिणाम करतात. इतकंच नाही तर आपल्या डीएनएवरही याचा खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे खाद्यपदार्थ एका विशिष्ट प्रकारेच शिजवून खाणे आवश्यक आहे.

उच्च तापमानात शिजणारे पदार्थ धोक्याचे
तसेच तेलात डीप फ्राय केलेले अन्नपदार्थही कॅन्सरला कारणीभूत आहेत. जसे की, बटाटा, पापड वा तळणीचे इतर पदार्थ. या प्रक्रियेत अ‍ॅक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं जे शरीरात गेल्यावर कॅन्सरच्या शक्यतेत भर घालतं. हे पदार्थ खाताना जिभेवर विशेष नियंत्रण असणे आवश्यक आहे. विशेषतः हे पदार्थ एकामागोमाग एक न खाता वेळा वेळाने खावेत.

आणखी वाचा – वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

उष्णतेचा योग्य वापर
स्वयंपाकावेळी उष्णतेची विशेष काळजी घ्यावी. एखादा पदार्थ शिजवताना त्याचे तापमान किती असावे हे निश्चित करणे आवश्यक आहे. इतकंच नाही तर अल्प तापमानावर रोस्ट करण्यासारखे प्रकार शक्यतो टाळावेत. शिवाय प्रेशर कुकर सारख्या त्वरित अन्नपदार्थ शिजणाऱ्या गोष्टींचा अधिकाधिक वापर करावा. नियमितपणे फळं, भाज्या, फायबरयुक्त अन्न याचा आहारात समावेश केल्यास आपले लिव्हर सुधारते.

व्यसनाला रामराम
लिव्हरची काळजी घेण्याचे आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे मध्यपान टाळणे. अति मद्यपान, धूम्रपान, प्रोसेस्ड फूड्स, साखर आणि तळलेले पदार्थ याचा अतिरेक करू नये. दर ६ ते १२ महिन्यांनी आरोग्य तपासणी करुन घेतल्यास संभाव्य आजाराचं लवकर निदान होऊ शकतं. लिव्हर हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याच्यावर अनेक प्रक्रिया अवलंबून असतात, त्यामुळे त्यावर अधिक ताण येईल अशा गोष्टी करणं शक्यतो टाळावं.

Tags: dipika kakkarliver cancerliver cancer symptoms
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
rucha vaidya wedding

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.