Paaru-Aditya Return Kirloskar Mansion : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळणं आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कथानकात पुढे कोणता ट्विस्ट येणार यावर सर्व प्रेक्षकांच विशेष लक्ष वेधलं आहे. मालिकेतील पारू आणि आदित्य या प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री शरयू सोनावणे यांच्या जोडीला ही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
दरम्यान, प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा ट्विस्ट समोर येणार आहे. सध्या मालिकेत दाखवण्यात आलं आहे की, अहिल्यादेवींनी पारू आणि आदित्यच्या नात्याला स्वीकार न केल्यामुळे हे दोघेही किर्लोस्कर घरात राहत नाहीत. या परिस्थितीमुळे आदित्यचे वडील श्रीकांत यांना प्रचंड तणाव येतो. पारू आणि आदित्यला पुन्हा घरी आणण्यासाठी अहिल्यादेवींसोबत वाद घालत असताना श्रीकांत यांना हार्ट अटॅक येतो. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जातं.
आणखी वाचा – “तो जिंकला नाही याची खंत…”, प्रणित मोरेच्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी, लेकाचं तोंड भरून कौतुक केलं अन्…
दरम्यान, झी मराठी वाहिनीने ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला असून, त्यामध्ये श्रीकांत यांची प्रकृती गंभीर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. गंभीर अवस्थेत असूनही श्रीकांत पुढील उपचार आणि ऑपरेशनसाठी नकार देताना दिसतात. घरातील सर्वजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचवेळी श्रीकांत एक अट ठेवतात. ते स्पष्ट सांगतात की, “पारू आणि आदित्य जर पुन्हा किर्लोस्कर घरात आले, तरच ते उपचारासाठी तयार होतील”. श्रीकांतांची ही अट ऐकल्यानंतर अहिल्यादेवीदेखील अखेर ती अट स्वीकारताना दिसतात.
यानंतर मालिकेत श्रीकांत बरे होऊन घरी परत येतात आणि पारू-आदित्यच्या स्वागताची तयारी सुरू होते. घरात सुरू असलेली तयारी पाहून अहिल्यादेवी विचारात पडतात. त्यावर श्रीकांत भावुक होत म्हणतात, “आज कोणीतरी आपला वनवास संपवून घरी परत येणार आहे, माझा मोठा मुलगा आदित्य आणि त्याची बायको पारू येतायत” आता मालिकेत अहिल्यादेवी खरंच पारू आणि आदित्यचं मनापासून स्वागत करतील का? की पुन्हा एखादं नवं वळण त्यांच्या आयुष्यात अडथळा ठरणार? पारू-आदित्यच्या आयुष्याला नवी सुरुवात होणार की नाही?, हे पाहणं रंजक ठरणार आहे.





