Dharmendra birth anniversary : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या जाण्याने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. आज ८ डिसेंबर रोजी जयंती आहे. धर्मेंद्र यांची मुलं त्यांच्यासाठी खास पोस्ट करत आहेत. इतकंच नाहीतर त्यांचे चाहतेही त्यांच्या आठवणीत पोस्ट शेअर करत आहेत. ईशा देओल, बॉबी देओल आणि सनी देओल यांनी धर्मेंद्रसाठी पोस्ट केली आहे. सनी देओलची पोस्ट खूप खास आणि भावनिक असल्याचं समोर आलं आहे.
सनी देओलने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र आणि सनी देओल पर्वतांमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सनी विचारतो की, “पापा, तुम्ही एन्जॉय करत आहात का?”. तर धर्मेंद्र म्हणतात, “मुला, मला खूप मजा येत आहे”. सनी देओलने लिहिले, “आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. पप्पा नेहमी माझ्यासोबत असतात. माझ्या हृदयात आहेत. लव्ह यू बाबा. तुझी आठवण येते”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मधून पुन्हा एकदा पूर्णा आजींची EXIT?, रोहिणी हट्टंगडींचा मोठा निर्णय प्रेक्षक नाराज
सनी देओलचे धर्मेंद्रसोबत घट्ट नाते होते. सनी अनेकदा धर्मेंद्रसोबत सुट्टीवर जायचा. तो वडिलांसोबतच्या सुट्टीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असे. २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या ९०व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. धर्मेंद्र यांच्या मुलांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा विचार केला होता. मात्र धर्मेंद्र यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख झाले आहे.
आणखी वाचा – “त्याला कोणीतरी जास्त देतं म्हणून…”, सूरज चव्हाणवर भडकला डीपी, म्हणाला, “त्याला तीन-चारवेळा कॉल केले पण…”
धर्मेंद्र आणि सनी यांनीही एकत्र काम केले आहे. तो २००७ मध्ये आलेल्या ‘अपने साथ’ या चित्रपटात होता. हा चित्रपट साऱ्यांना खूप आवडला. याशिवाय त्याने ‘यमला पगला दीवाना’, ‘यमला पगला दीवाना २’, ‘सिंग साब द ग्रेट’, ‘यमला पगला दीवाना फिर से’, ‘वर्दी’, ‘सुलतनत’, ‘सनी’, ‘सावरे वाली गाडी’ यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत.





