कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या.घरामध्ये बिग बॉस मराठी सिझन २ मधील पहिली वाईल्ड कार्ड झाली आणि ती म्हणजे हीना पांचाळ.हीनाच्या घरात जाण्याने आता काय घडेल ? ती कोणत्या ग्रुप मध्ये जाईल हे लवकरच कळेल. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून मागील आठवड्यामध्ये मैथ्थिली जावकर घराबाहेर पडली. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. 

या आठवड्यामध्ये पराग काल सेफ झाला.नेहा शितोळे, विणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके नॉमिनेशन होते ज्यामध्ये अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले.  या आठवड्यामध्ये दिंगबर नाईक यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले आहे. 


पुढे येणाऱ्या रंजक गोष्टींसाठी नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन-२ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.