शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठा समाजातल्या मागास…”, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “त्यांच्या तब्येतीसाठी मी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 30, 2023 | 7:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Riteish Deshmukh tweet for Manoj Jarange

“मराठा समाजातल्या मागास…”, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “त्यांच्या तब्येतीसाठी मी…”

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे सध्या जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. गेल्या बुधवारपासून ते उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, राज्यभरातील समाजबांधवांकडून त्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसह अनेक मराठी कलाकार मंडळीही या आंदोलनाबद्दल आपली मत व्यक्त करताना दिसत आहे. अशातच, प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने यासंदर्भात एक ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Riteish Deshmukh tweet for Manoj Jarange)

रितेश देशमुखने नुकतंच एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्याने मनोज जरांगे यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत शासनाने याकडे त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली. या ट्वीटमध्ये तो असं म्हणाला की, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातील मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी मनोज जरांगे हे शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल, अशी अपेक्षा बाळगतो.”. रितेशच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहे.

हे देखील वाचा – श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात कोर्स करण्यासाठी गेली प्राजक्ता माळी, म्हणाली, “गुरुपूजा पंडित स्वतःला म्हणू शकते कारण…”

जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. ???????? pic.twitter.com/Qffzej8Y4k

— Riteish Deshmukh (@Riteishd) October 30, 2023

केवळ रितेश नव्हे, तर याआधी ‘बिग बॉस’ फेम किरण माने, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे यांनीही या मुद्द्यावर आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. अश्विनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मनोज जरांगे यांची पोस्ट शेअर केली होती. तर अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिलं होतं की, “या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करत आहेत!”, असं म्हणत मनोज जरांगे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे किरण यांनी यात म्हटले होते.

हे देखील वाचा – “जर महाराज नसते ना…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्विनी महांगडेने केलेल्या वक्तव्याची चर्चा, म्हणाली, “तुमची आडनावं मुल्ला, खान…”

दरम्यान, मनोज जरांगे हे याआधीही उपोषणाला बसले होते. त्यावेळी राज्य सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, शासनाने दिलेली मुदत न पाळल्याने ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

Tags: marathi actorriteish deshmukhRiteish Deshmukh tweet for Manoj Jarange-Patiltwitter
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Badshah Controversy Online App Case

ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून गायक बादशाहची चौकशी, पण यामागचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.