Don 3 Teaser Out : २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘डॉन’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर २०११मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. ‘डॉन’च्या सीरिजला मिळत असलेला प्रतिसाद पाहता या दिग्दर्शक फरहान अख्तर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली. ‘डॉन ३’च्या घोषणेनंतर प्रेक्षकांना चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘डॉन ३’मध्ये शाहरुखच दिसणार का? अशाही चर्चा रंगत होत्या. अखेरीस चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. फरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘डॉन ३’चा टीझर शेअर केला आहे. (Don 3 Teaser Out)
‘डॉन ३’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटामधील मुख्य अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख नव्हे तर रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहे. रणवीर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार या निव्वळ चर्चा होत्या. आता या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. ‘डॉन ३’चा टीझर पाहून प्रेक्षक विविध कमेंट करत आहेत. तर रणवीरच्या लूकचंही कौतुक होत आहे.
या टीझरमध्ये रणवीरचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. “११ मुल्कों की पुलिस ढुंढती है जिसे, पर पकड पाया है कौन, मैं हूँ डॉन…” हा रणवीरच्या तोंडी असलेला संवादही टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच या संपूर्ण टीझरमध्ये फक्त रणवीरचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने टीझरमधील इतर संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – “माझं नाव वापरु नकोस”, नियम मोडणाऱ्या क्रांती रेडकरची समीर वानखेडेंनी केलेली कानउघडणी, म्हणाले, “अशा फालतू…”
चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना शाहरुखची आठवण आली आहे. काहींनी या टीझरचं कौतुक केलं आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा डॉन एक तासातच पकडला जाईल, शाहरुख खानच डॉन म्हणून हवा होता, शाहरख खान कुठे आहे?, स्वस्तामधील डॉन अशा विविध कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.