शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साडीने ओटी भरली, औक्षण केलं अन्…; मैत्रिणींनी दिलेलं सरप्राइज पाहून रडल्या सुकन्या मोने, म्हणाल्या, “जगातील…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 8, 2023 | 12:36 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
baipan bhari deva sukanya mone

साडीने ओटी भरली, औक्षण केलं अन्...; मैत्रिणींनी दिलेलं सरप्राइज पाहून रडल्या सुकन्या मोने, म्हणाल्या, “जगातील...”

सध्या सगळीकडे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतार्यंत ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला ‘बाईपण भारी देवा’ने तगडी टक्कर दिली. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. वंदना गुप्ते, दीपा चौधरी, सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर या सहाही अभिनेत्रींमध्ये चित्रपटात अगदी धमाल केली आहे. दरम्यान चित्रपटाला मिळालेलं यश पाहून ‘बाईपण भारी देवा’मधील कलाकार भारावून गेले आहेत. याचदरम्यान सुकन्या यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘बाईपण भारी देवा’च्या संपूर्ण टीमची सचिन तेंडुलकरनेही भेट घेतली. तसेच त्याने त्याच्या पत्नीसह हा चित्रपट पाहिला. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सुकन्या यांच्या माहेरच्या बालमैत्रिणींनी त्यांना अनोखं सरप्राइज दिलं. मैत्रिणींचं प्रेम पाहून सुकन्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहायला मिळाले. या सुंदर क्षणांचा व्हिडीओही सुकन्या यांनी शेअर केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, याच महिन्यात लग्नाचा वाढदिवस होता पण…

व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या, “’बाईपण भारी देवा’ला घवघवीत यश प्राप्त झालं आणि अजूनही होतय, होईल. सगळीकडे संपूर्ण टीमचं कौतुक होत आहे. पण जेव्हा आपल्या माहेरच्या बालमैत्रिणी आपल्याला सरप्राइज देतात, साडीने ओटी भरतात, नानाविध स्वतःच्या हाताने केलेली कलाकृती भेट म्हणून देतात, लेख लिहितात, गॉगल लावून फोटो काढतात, आवडते खाद्यपदार्थ करतात, माझ्या फोटोंचे मास्क लावून माझे स्वागत करतात, औक्षण करतात, केक आणतात. कित्ती कित्ती आणि काय सांगू”.

आणखी वाचा – Kranti Redkar Sameer Wankhede Love Story: अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडेंनीच सांगितली लव्हस्टोरी, म्हणाले,”ती माझी…”

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

आणखी वाचा – ‘माझं नाव वापरु नकोस’ नियम मोडणाऱ्या क्रांती रेडकरची समीर वानखेडेंनी केलेली कानउघडणी, म्हणाले, “अशा फालतू…”

“ज्या काकूंना लहानपणापासून पाहिलं आहे त्या पत्राद्वारे कौतुक, प्रेम, आशीर्वाद देतात तेव्हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाल्या सारखा वाटतं. त्यांचे प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा हीच माझी खरी कमाई आहे. खूप खूप श्रीमंत झालेय मी”. सुकन्या यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचीही अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

Tags: baipan bhari devabaipan bhari deva marathi moviemarathi actresssukanya mone
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Senior Actor Madhav Abhyankar Exit From The Tharla Tar Mag Serial

मीरा जगन्नाथनंतर आणखी एका कलाकाराचा ‘ठरलं तर मग’ मालिकेला रामराम, नव्या अभिनेत्याची एण्ट्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.