छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. बरीच वर्षे सुरु असणाऱ्या या कार्यक्रमाने आपल्या कथानकाच्या जोरावर त्याचा चाहता वर्ग तयार केला आहे. आशयघन कथानक, त्याला सोबत विनोदाची झालर असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळते. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एकामागोमाग एक कलाकार मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप करत सुटले आहेत. मालिकेत तारक मेहता यांची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी निर्माते असित मोदी यांच्या विरोधात केलेली केस जिंकली, आणि या खटल्या अंतर्गत त्यांना १ कोटी देखील मिळाले.
पाहा निर्मात्यांनी का फेकली होती खुर्ची (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
तसेच या कार्यक्रमातील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल या अभिनेत्रीने या आधी निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सिंगापूरमध्ये शूट करत असताना निर्मात्यांनी गैरवर्तवणूक करत छळ केल्याचा आरोप देखील यापूर्वी जेनिफर ने केला होता. यापाठोपाठ आता आणखी एक गैरवर्तणूक झाल्याची बाब समोर आली आहे.
या मालिकेत बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियाने याबाबतचा खुलासा केला आहे. या गैरवर्तणुकीबाबत तिने सांगितलं की मालिकेतील मुख्य अभिनेत्याला दुखापत झाली होती. मात्र ही दुखापत गैरवर्तणुकीमुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ही दुखापत झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी मालिका ज्या पात्रावर प्रसिद्धीच्या झोतात आहे ते पात्र म्हणजे जेठालाल गडा म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी.
मोनिकाने याबाबत बोलताना सांगितलं की, “एकेदिवशी मालिकेच्या सेटवर मोठा वाद झाला होता. मात्र त्यादिवशी मी सेटवर हजर नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सेटवर पोहोचली तेव्हा मला समजलं की मालिकेचे ऑपरेशन हेड सोहैल रमाणी यांनी दिग्गज अभिनेत्याला चुकीची वागणूक दिली. हा दिग्गज अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे दिलीप जोशीच होते. मोनिकाने पुढे सांगितलं की, खुर्ची फेकून दिलीप यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर सोहैल यांना मालिकेतून काढण्याऐवजी त्यांना फक्त दोन वर्षांसाठी बॅन करण्यात आलं होतं.”