कलाक्षेत्रातील चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे प्रियांका चोप्रा व निक जोनस. प्रियांका व निक त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. प्रियांका परदेशातच निकबरोबर राहत आहे. बऱ्याचदा ती निकच्या कॉन्सर्टला हजेरी लावताना दिसते. आताही निकच्या कॉन्सर्टसाठी प्रियांका गेली होती. यादरम्यानचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या कॉन्सर्टदरम्यान एक विचित्र प्रकार घडला. त्याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.(Nik Jonas Concert Video Viral)
निक आणि त्याचे भाऊ केविन जोनास व जो जोनासचं न्यूयॉकमध्ये कॉन्सर्ट होतं. प्रियांका यावेळी संपूर्ण कॉन्सर्ट एण्जॉय करताना दिसली. तर जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टला हजारो चाहत्यांची गर्दी जमली. या गर्दीमध्ये एका चाहतीने केलेला प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण झाले.
वाचा – काय घडलं नेमकं कॉन्सर्टमध्ये?(Nik Jonas Concert Video Viral)
निक ब्रदर्स शनिवारी न्यूयॉर्कच्या यँकी स्टेडियममध्ये कॉन्सर्टसाठी पोहोचले. कॉन्सर्ट सुरू असताना एका महिला चाहतीने केलेलं वर्तन धक्कादायक होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये निक स्टेजवर गाताना दिसत आहे. कॉन्सर्ट सुरू असताना एका महिला चाहतीने त्याच्यावर ब्रा फेकली. यानंतर निक काही क्षण थांबला. काही क्षणांसाठी नेमकं काय घडलं? हे त्यालाही कळलं नाही.
चाहतीने ब्रा फेकल्यानंतर उपस्थितांमध्येही एकच गोंधळ उडाला. एका फॅनपेजद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं की, “निकच्या कॉन्सर्टचे काही क्षण, ज्यामध्ये एका चाहतीने त्याच्यावर ब्रा फेकली. ही आश्चर्याची बाब आहे. लोक कधी विचारांनी मोठे होतील आणि कलाकारांचा आदर करायला लागतील? कृपया अशा प्रकारचं कृत्य करू नका!” या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एकाने प्रतिक्रिया दिली की, “ हा प्रकार निकसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप अपमानास्पद आहे. चाहत्यांनी कलाकारांचा आदर करायला शिकलं पाहिजे”. दुसऱ्या एका चाहत्याने पोस्ट केलं, “हे खूप लाजिरवाणं आहे. स्वतःला चाहता म्हणणं आणि कलाकारावर ब्रा फेकणं ही खूप अपमानास्पद बाब आहे”. या अगोदरही निकच्या कॉन्सर्टमध्ये असाच प्रकार घडला होता.