ओटीटी विश्वातील प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला असून लवकरच या पर्वाचा नवा विजेता घोषित होणार आहे. एकीकडे या ग्रँड फिनालेची चर्चा होत असताना याच पर्वात सहभागी झालेल्या आणखी एका व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे अभिनेत्री जिया शंकर. जिया शंकर काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. मात्र, घराबाहेर पडताच ती अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच अभिनेत्री एका कारणामुळे पुन्हा चर्चेत आलेली आहे. (Jiya Shankar Bigg Boss OTT 2)
अभिनेत्री जिया शंकरला बिग बॉसच्या घराबाहेर पडून आठवडाही झाला नाही, तो वर तिने एक नवी कोरी आलिशान कार स्वतःला गिफ्ट केली आहे. जिया शंकरने BMW कंपनीची कार घेतली असून BMW X1 असे या मॉडेलचे नाव आहे. या कारची किंमत तब्बल ४५ ते ५० लाख रुपये इतकी आहे.
हे देखील वाचा – सिद्धार्थ जाधवने आई बाबांना पहिल्यांदाच परदेशात फिरायला पाठवलं अन्…; भावुक होत म्हणाला, “ते मला नेहमी सांगायचे…”
अभिनेत्री जिया शंकरच्या या नव्या कारचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात जिया शंकर नारळ फोडताना दिसत आहे, तर तिची आई नव्या कारची पूजा करताना दिसत आहे. कारच्या पूजेनंतर जिया शंकर उपस्थित पापाराझींचे तोंड गोड करते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी जियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Jiya Shankar buying a new Car)
हे देखील वाचा – ‘अंकुश’ चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, ऍक्शनचा भरणा असलेल्या चित्रपटात रंगणार केतकी माटेगांवकर व दीपराज घुलेचा रोमान्स
अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री जिया शंकर जेव्हा बिग बॉस ओटीटीच्या घरात आली, तेव्हापासूनच ती अनेक कारणांनी चर्चेत आली होती. तिचे घरातील स्पर्धकांशी अनेकदा खटके उडाल्याने अनेकांनी तिला जोरदार ट्रोल केलं होतं. तरीही तिने आपल्या खेळाच्या जोरावर टॉप ६ पर्यंत मजल मारली होती. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे.