सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधूचा जुना प्रियकर तिच्या लग्नात पोहोचला आणि नंतर त्याने घातलेला गोंधळ त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामुळे उपस्थितांमध्येही एकच चर्चा रंगली. आपल्या आयुष्यामध्ये लग्नाचा क्षण प्रत्येकासाठी खूप खास असतो. यासाठी काही जण हजारो मैल दूर जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात, तर काहींनी घरी अनोख्या पद्धतीने लग्न करण्याची हौस असते. तर काहीजण घरी खास पद्धतीने त्याचे आयोजन करतात.
प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की त्याच्या/तिच्या लग्नाच्या दिवशी कोणताही त्रास होऊ नये, पण कल्पना करा जर अचानक एखाद्या मुलाची जुनी प्रेयसी किंवा मुलीचा जुना प्रियकर आला तर? ही कल्पनासुद्धा करवत नाही ना? त्यामुळे लग्नमंडपात काय परिस्थिती उद्भवू शकते आणि किती लोकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो आणि मनस्ताप होईल तो वेगळाच असेल. खरंतर असे काही कुणाच्याच आयुष्यात घडू नये.
पण अलीकडे असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरमाला घालायच्या दरम्यान मुलीचा प्रियकर अचानक स्टेजवर पोहोचतो आणि त्यानंतर तो संपूर्ण मंडपात मोठा गोंधळ घालतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. मात्र, हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, याबद्दल काहीच अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
व्हिडीओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, मुलगी हातात हार घेऊन स्टेजवर उभी असते आणि म्हणजे याचा अर्थ एकमेकांना हार घालण्याचा विधी सुरु असतो. ती हार वराला घालणारच होती, पण तेवढ्यात तिथे तिचा जुना प्रियकर तिथे पोहोचतो. यानंतर वराशी तो भांडणही करतो म्हणजे थेट वराशी वाद घालताना दिसतो. दुसरीकडे, मुलगी हातात हार घेऊन शांतपणे हा घडत असलेला सर्व प्रकार बघत उभी असलेली दिसत आहे.