गेल्या ११ ऑगस्टला बॉलीवूडचे दोन तगडे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. त्यातील एक चित्रपट म्हणजे, अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’. २००१ साली प्रदर्शित झालेला “गदर : एक प्रेमकथा” चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, तेव्हापासून चाहते याच्या सिक्वेलची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आता तब्बल २२ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला असून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहे. (Gadar 2 Movie)
सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे अनेक रेकॉर्डस् मोडले आहे. अशातच तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले असून या तीन दिवसात ‘गदर २’ने चांगलीच कमाई केल्याचे दिसत आहे.
हे देखील वाचा – Video : …अन् निक जोनास गाणं गात असताना चाहतीने फेकली ब्रा, प्रियांका चोप्राही उपस्थित होती पण…; व्हिडीओ व्हायरल
‘गदर २’ ने दोन दिवसात ८३ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५२ कोटी रुपयांची कमाई करत तीन दिवसात तब्बल १३३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सोबतच पठाण, बाहुबली सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा तीन दिवसांचा रेकॉर्ड ‘गदर २’ने मोडला आहे.
हे देखील वाचा – Video : ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अभिनेत्री जिया शंकरने खरेदी केली महागडी कार, किंमत आहे तब्बल…
एकंदरीतच पहिल्या आठवड्यात ‘गदर २’ ने चांगली कमाई केली असून सलग सुट्ट्या व त्यात १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशभक्तीची लाट यामुळे चित्रपट आणखी कमाई करणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात सनी देओलसह, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. (Gadar 2 Box Office Collection Day 3)