रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“संस्कार केले नाहीत का?”, ट्रोलर्सला सुनावल्यानंतर त्यानेच ऐश्वर्या नारकरांना दिलं उलट उत्तर, म्हणाला, “हॉट म्हटलं तर तुम्ही काही बोलत नाही अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 4:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar Angry On Netizen

"संस्कार केले नाहीत का?", ट्रोलर्सला सुनावल्यानंतर त्यानेच ऐश्वर्या नारकरांना दिलं उलट उत्तर, म्हणाला, "हॉट म्हटलं तर तुम्ही काही बोलत नाही अन्..."

मराठी कलाविश्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर. ऐश्वर्या व अविनाश हे गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आजवर या नारकर कपलने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या जोडप्याची एनर्जी एखाद्या तरुणाईला लाजवेल अशी आहे. कलाकार म्हणून गेला अनेक काळ ही जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.त्यांच्या कामासोबतच ही जोडी सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. (Aishwarya Narkar Angry On Netizen)

नारकर कपलचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रील सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. आता दोघेही वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसतात. पण मालिकांच्या व्यस्त शेड्यूलमधून दोघेही वेळात वेळ काढून रीलदेखील बनवतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या नवऱ्याबरोबर केलेल्या डान्स व्हिडीओनंतर एका नेटकऱ्याने त्यांना इन्स्टाग्राम अकाउंटवर मॅसेज करत ट्रोल केलं आहे. मात्र नेटकऱ्याला या मॅसेजनंतर त्यांनी सरळ उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “आईबरोबर टीव्ही बघत होतो आणि…”, टीव्ही शोमध्ये खिल्ली उडवण्यावरुन संतापला करण जोहर, म्हणाला, “तुमचीच इंडस्ट्री जेव्हा…”

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेटकऱ्याबरोबरचा संवाद पोस्ट केला आहे. यांत त्याने मॅसेज करत असं म्हटलं हे की, “तुम्ही इतके हॉट डान्स करता आणि तुमचा नवरा तुमचा व्हिडीओ व परफॉर्मन्स खराब करतो”, असा मॅसेज केला आहे. यावर ऐश्वर्या नारकरांनी त्या नेटकाऱ्याला चांगलीच अद्दल शिकवलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी. त्यांच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट काढत नेटकऱ्याच्या वडिलांच्या नावावरुन कॅप्शन देत जाब विचारला आहे. “बाबुलाल संस्कार केले नाहीत का?”, असा थेट सवाल विचारात त्या नेटकऱ्याला टॅग केलं आहे.

आणखी वाचा – “आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन अन्…”, आदेश बांदेकरच्या लेकाने सांगितलं कसं करणार लग्न?, म्हणाला, “कोर्टात जाऊन…”

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये नेटकऱ्याचा संवाद पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या यांनी टॅग करत स्टोरी पोस्ट करताच, त्या नेटकऱ्याने मॅसेज करत असं म्हटलं की, “मॅडम मला ब्लॉक करा. तुम्हाला हे शोभत नाही, तुमचं काय करायचं. हॉट बोलत होतो तेव्हा तुम्हाला मस्त वाटत होतं”, असं म्हटलं.

Tags: aishwarya narkar and avinash narkarAishwarya Narkar Angry On Netizenaishwrya narkar on trollingmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi writer, director and lyricist Kshitij Patwardhan shared post praising Abhinay Berde

“बरीच मुलं वारसा घेतात पण...”, अभिनय बेर्डेबद्दल प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शकाची खास पोस्ट, म्हणाला, “अतिशय गुणी, मेहनती…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.