गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आजारपणामुळे गमावला जीव, आत्महत्या अन्…; ‘या’ कलाकारांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला २०२३मध्ये मोठा धक्का

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 31, 2023 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Celebrity deaths in 2023

आजारपणामुळे गमावला जीव, आत्महत्या अन्...; 'या' कलाकारांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला २०२३मध्ये मोठा धक्का

Celebrity deaths in 2023 : २०२३ या वर्षात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला बऱ्याच धक्क्यांमधून जावं लागलं. कोणाला चित्रपट फ्लॉप गेल्याने तर कोणाला वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींमुळे तर काहींच्या निधनाच्या बातमीमुळे हे वर्ष तितकं चांगलं गेलं नाही. यंदाच्या वर्षात अनेक हरहुन्नरी कलाकारांनी आपला जीव गमावला मात्र त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. या कलाकारांची मेहनत, त्यांचा अभिनय प्रेक्षकवर्ग कधीही विसरु शकणार नाही. २०२३ या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या अशा या कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

भालचंद्र कुलकर्णी
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी आज १८ मार्च रोजी सकाळी कोल्हापुर येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र यांनी ३०० च्यावर चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. मराठी चित्रपट सृष्टीत सहाय्यक भूमिकेने भालचंद्र कुलकर्णी यांनी छाप सोडली होती. ‘नवरा नको गं बाई’, ‘पिंजरा’, ‘मुंबईचा जावई’, ‘सोंगाड्या’, ‘थरथराट’, ‘खतरनाक’ अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी दमदार भूमिका साकारल्या. भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेसृष्टीतील योगदान फार मोठं आहे.

आणखी वाचा – “…बाकी सगळ्या मारक्या म्हशी”, गृहप्रवेशादरम्यान प्रथमेश लघाटेचा बायकोसाठी मजेशीर उखाणा, सगळेच पोट धरुन हसू लागले अन्…

मिलिंद सफई
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते मिलिंद सफई यांचं २५ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झालं आहे. मिलिंद यांचं कर्करोगाच्या आजारामुळे निधन झालं आहे. मिलिंद सफई हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते होते. मालिकांसह अनेक सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘लकडाऊन’, ‘पोस्टर बॉईज’, ‘मेकअप’ अशा अनेक मराठी सिनेमांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.

ज्युनियर मेहमूद
अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद यांचे ८ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. ज्युनियर महमूद यांनी मुंबईतील खार येथील राहत्या घरात वयाच्या ६७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूद यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. ज्युनिअर मेहमूद यांनी ‘संघर्ष’, ‘ब्रह्मचारी’, ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग’, ‘हाथी मेरे साथी’, ‘हंगामा’, ‘छोटी बहू’, ‘दादागिरी’सह अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची जादू दाखविली. मेहमूद यांनी अभिनेते राजेश खन्ना, गोविंदा यांच्या चित्रपटांमध्ये जास्त काम केले.

आणखी वाचा – संतोष जुवेकरची आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, दोघांचा एकत्र फोटो शेअर करत म्हणाला, “तुमच्या संसारासाठी…”

दिनेश फडणीस
सीआयडी फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे ५ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेत ते इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र साकारत होते. लिव्हर डॅमेज असल्याने त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

सीमा देव
मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्ट रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या.

आणखी वाचा – “तुच माझी ॲक्शन अन् कट”, हेमंत ढोमेची त्याच्या आयुष्यातील झिम्मागर्लसाठी खास पोस्ट, म्हणाला, “मी आज जे काही…”

रवींद्र महाजनी
‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘जिवा सखा’, ‘पानिपत’ अशा अनेक दर्जेदार मराठी व हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे १४ जुलै रोजी आकस्मित निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते पुण्यात राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या आकस्मित निधनाने मराठी मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली.

Tags: Celebrity deaths in 2023celebrity passes awaymarathi celebritymarathi malikamarathi moviemarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
aastad kale mother passed away

“ती गेली तेव्हा...”, आस्ताद काळेच्या आईचं निधन, अंगावर काटा आणणारी पोस्ट, म्हणाला, “अजूनही रडलो...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.