कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच काही ना काही चाहत्यांसह शेअर करत असतात. बरेच कलाकार त्यांच्या आई वडिलांबद्दल तर काही लाईफ पार्टनर वा मुलांबद्दल पोस्ट शेअर करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत. हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने शेअर केलेल्या आई-बाबांसाठीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पोस्टवरील कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Santosh Juvekar Special Post For Parents)
संतोषने सोशल मीडियावरुन त्याच्या आई वडिलांचा एक सुंदर असा फोटो शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत तो म्हणाला, “काल आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता. आज मी पोस्ट शेअर करत आहे कारण मला हवा तसा फोटो सापडत नव्हता. तो फोटो आज सापडला आणि त्यांचा हा फोटो मला खूप आवडला आहे. आईने काल बाबांना स्मार्टफोन गिफ्ट केला आणि ती त्यांना तो कसा वापरायचा हे शिकवत होती. बाबा आईचं नीट लक्ष देऊन ऐकत होते. अगदी असंच ते लग्न झाल्यापासून आईचंचं ऐकत आले आहेत म्हणून आजही सुरक्षित व उत्तम आयुष्य जगत आहेत” असंही तो म्हणाला.
यापुढे त्याने आईने सांगितलेला किस्सा सांगत म्हटलं, “आईने काल तिची लग्नातली आठवण सांगितली. लग्न झाल्यावर सासरी जाताना तिची आई म्हणाली होती “आता तू आमची राहिली नाहीस आता तु तुझा संसार खंबीरपणे सांभाळ. प्रत्येकवेळी माहेरी यायचं नाही तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा”. आई-बाबा मला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही दोघांनी करुन दाखवलं, लढलात पडलात, पुन्हां लढलात. तुम्ही तुमच्या संसारासाठी अगदी आमच्यासह जे काही केलं आहे ते खूप अमूल्य आहे. तुमच्या प्रेमाची व कष्टाची जाण आम्हाला कायम राहो हाच तुमचा व देवाचा आम्हाला आशीर्वाद लाभु दे. खूप प्रेम. नांदा सौख्यभरे” असं म्हणत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
संतोष त्याच्या आईचे अनेक व्हिडीओ, फोटो नेहमीच शेअर करत असतो. अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्याने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. संतोषने शेअर केलेल्या या पोस्टवरही त्याचे चाहते त्याला मिस करत असल्याची कमेंट करत आहेत.