अभिनेता इमरान हाश्मी हा आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. इमरानने आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. तसेच त्याचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे.पण तो नेहमी या चर्चापासून दूरच असलेला पाहायला मिळाला. त्याने २००६ मध्ये त्याची मैत्रीण परवीन सहानीबरोबर लग्न केले.त्याला एक मुलगाही आहे. लग्नाच्या १७ वर्षानंतर त्याने आपल्या पत्नीबद्दल एक खुलासा केला आहे. (Emran Hashmi on his wife)
काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलाखतीमध्ये आपले खासगी आयुष्य व व्यावसायिक आयुष्यावर भाष्य केले आहे. वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना त्याने सांगितले की, “मी माझ्या फिटनेससाठी १३ वर्षांआधी केवळ किनोआ खात असे. पण आता त्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले आहेत. आता रोज वेगवेगळे पदार्थ आम्ही खातो आणि जे डाएट असते ते मी सलग एक वर्ष पाळतो”. त्यावर इमरानला विचारले गेले की “तुझ्याबरोबर तुझे कुटुंबदेखील हेच डाएट फॉलो करते का? त्यावर तो म्हणाला की, “नाही. माझ्या पत्नीला हे आवडत नाही. सतत एकच जेवण जेवून कंटाळा येतो. कधी कधी तर मला माझी बायको सोडून जाईन अशीही धमकी देते. पण अजून तरी असे काही झालं नाही आहे”, असं त्याने खूप मजेशीर पद्धतीने सांगितले.
इमरानचा मुलगा अयानला वयाच्या तिसऱ्या वर्षी किडनीचा कर्करोग झाला होता. त्यानंतर पाच वर्षांनी अयान कर्करोगमुक्त झाल्याचेही घोषित केले होते. त्यानंतर त्याने बिलाल सिद्दीकीबरोबर ‘द किस ऑफ लाईफ,हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफीटेड कँसर’ नावाचं पुस्तकही लिहिलं होतं. या पुस्तकात त्याने आपल्या मुलाच्या संघर्षाची कहाणी लिहिली आहे.
इमरान नुकताच अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. यानंतर आता तो ‘शोटाइम’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राजीव खंडेलवाल,मौनी रॉय, नसिरुद्दीन शाह, महिमा मकवाना व श्रीया सरन हेही दिसणार आहेत. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर असून मिहिर व आर्चित दिग्दर्शन करणार आहेत.