भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुएकक्ष अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाची धूम अजूनही पाहायला मिळत आहे. हा सोहळा सर्व दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातील सर्वच कार्यक्रमांचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.सर्वांनीच या सोहळ्याचे कौतुक केले आहे. पण अशातच अभिनेत्री राखी सावंतने नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करत तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Rakhi Sawant on Ambani pre-wedding)
राखीने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दर्शवली आहे तर काही जण तिला ट्रोलही करत आहेत. ती या व्हिडीओमध्ये म्हणाली की, “नमस्कार अंबानीजी, तुम्ही मला प्री-वेडिंगसाठी का बोलावलं नाही? तुम्ही जर बोलावलं असतं तर मी मंच,खुर्च्या तोडल्या असत्या. अंबानीजी तुम्ही अजून माझा डान्स पाहिलेला नाही. रिहाना,एकॉन यांना तुम्ही का बोलावलंत?हे माझ्यासमोर शेंगा आहेत. मी आतापर्यंत ‘मुन्नी बदनाम’, ‘परदेसिया’, ‘देखता है तू क्या?’ एवढी गाणी मी केली तरीही तुम्ही मला का बोलावलं नाही? रिहाना तरीही फाटक्या कपड्यांमध्ये आली. मी आले असते तर एकदम हॉट व सेक्सी कपडे घातले असते. माझ्या कपड्यांनी मी तुमचा स्टेज पुसला असता”.
आणखी वाचा – सोशल मीडियावर का नाही आहे राणी मुखर्जी?, स्वत:च खुलासा करत म्हणाली, “साधे जीवन…”
पुढे ती म्हणते की, “मला बोलवण्याचे चार फायदे होते. मी मनोरंजन केले असते, डान्स केला असता, तुमचे जितके पाहुणे आले होते त्यांचं जेवून झाल्यानंतर भांडी घासली असती. सर्वांच्या खोल्या साफ केल्या असत्या. मी काय केलं नसतं ? तुम्ही हजार कोटी खर्च करुन कोणाला बोलावलंत? तुम्ही राखी सावंतला बोलावलं नाही , ही तुम्ही काय केलं ?,” असं ती म्हणाली.राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकाऱ्यांनी तिला ट्रोलही केलं आहे.
दरम्यान अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या सोहळ्याला समस्त बॉलिवूडकरांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमामध्ये अनेकांनी डान्स परफॉर्मन्स केले. तसेच उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना जामनगर व वनताराची सफरही घडवली.