‘ये रिश्ता क्या केहलता है’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता करण मेहरा घराघरांत पोहोचला. या कार्यक्रमामुळे करणला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मध्यंतरी करण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. करण व त्याच्या पत्नीमधील वादामुळे तो चर्चेत आला होता. करण व त्याची पत्नी निशा यांच्या घटस्फोटामुळे दोघेही चर्चेत आले. दोन वर्षांपूर्वी निशाने तिचा पती करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर ती करणपासून आपल्या मुलाला घेऊन वेगळी झाली. दरम्यान करण व निशा चर्चेत आलेले पाहायला मिळाले. (Karan Mehra wife Nisha Rawal Post)
यानंतर आता करण मेहराची पत्नी निशा रावल चर्चेत आली आहे. करणच्या एक्स पत्नीबाबत म्हणजेच अभिनेत्री निशा रावलबाबत एक बातमी समोर आली आहे. तिने स्वत:चं घर खरेदी केलं असल्याची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली आहे. निशाने मुंबईतील मीरा रोड येथे स्वतःच नवं घर घेतलं आहे. स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता निशाने स्वतःचं हे स्वप्न पूर्ण करत हक्काचं घर घेतलं आहे. लेकाबरोबर नव्या घराचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये निशा तिचा मुलगा काविशबरोबर तिच्या नव्या घरात गणेशपूजा पूजा करताना दिसत आहेत. यावेळी दोघांनी मॅचिंग कपडे परिधान केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने “नव्या सुरुवातीचा सुगंध”, असं कॅप्शन दिलं आहे. निशा व करणमध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी निशाने करणला घराबाहेरचा रस्ता दाखवला. पण नंतर तिला घराचे हफ्ते भरता आले नाहीत त्यामुळे तिला राहतं घर सोडावं लागलं.
निशा व करण यांनी ५ वर्षे डेट केल्यानंतर करणने निशाच्या वाढदिवसाला तिला फिल्मी स्टाईलमध्ये लग्नासाठी प्रपोज केले, त्यानंतर निशाने लग्नाला होकार दिला. २४ नोव्हेंबर २०१२ रोजी करण व निशाचे लग्न झाले. त्यानंतर निशा रावलने करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केले. मीडियासमोर ती गंभीर जखमी अवस्थेत समोर आली.निशाने करणवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला. दरम्यान करणनेही निशावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसह अनेक गंभीर आरोप केले.