शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रेव्ह पार्ट्यांवरुन करण्यात येणाऱ्या आरोपांवर एल्विश यादवने सोडलं मौन, गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणाला, “यामध्ये सत्य नाही तरीही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 3, 2023 | 2:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Elvish Yadav Clarification

रेव्ह पार्ट्यांवरुन करण्यात येणाऱ्या आरोपांवर एल्विश यादवने सोडलं मौन, गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणाला, "यामध्ये सत्य नाही तरीही…"

प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवविरोधात रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस एफआयआरनुसार, एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असे. तसेच या पार्टीत बंदी असलेले साप आणि परदेशी मुलींनाही प्रवेश मिळाल्याचं समोर आलं. या प्रकरणावरून एल्विशसह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता एल्विश यादवने मौन सोडलं आहे. (Elvish Yadav Clarification)

एल्विश यादवने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एल्विशने रेव्ह पार्ट्यांवरून त्याच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांवर भाष्य केलं आहे. व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला की, “मी सकाळी उठलो तेव्हा पाहिलं की माझ्या विरोधात कोणत्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सर्व मीडियाद्वारे असं सांगण्यात येत होतं की, एल्विश यादवला अटक झाली आहे, एल्विश यादव ड्रग्जसह पकडला गेला, या सर्व गोष्टी माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत, माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व आरोप खोटे आहेत, यांत एक टक्केही सत्यता नाही.”

आणखी वाचा – रेव्ह पार्टी, विषारी साप अन् परदेशी मुली पुरवल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

View this post on Instagram

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

यापुढे बोलताना एल्विश म्हणाला, “मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. आणि मी यूपी पोलिस, संपूर्ण प्रशासन, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांना विनंती करेन की या गोष्टीत माझा एक टक्काही सहभाग आढळला तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची आई शाहरुख खानच्या ‘डंकी’मध्ये दिसणार, ट्रेलरमध्ये दिसली झलक, कोण आहे ही अभिनेत्री?

जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत, अशी विनंतीही एल्विश याने माध्यमांना केली आहे. तो म्हणाला, “मी मीडियाला विनंती करतो की, जोपर्यंत तुमच्याकडे ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत माझे नाव बदनाम करू नका. आणि जे काही आरोप झाले आहेत, त्यांच्याशी माझा खूप दूरपर्यंत काहीही संबंध नाही. अगदी १०० मैलापर्यंत माझा काही संबंध नाही. हे सिद्ध झाले तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.”

Tags: bigg bossbigg boss ottbigg boss ott winnerelvish yadaventertainmentFIR Against Elvish Yadav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ankita Lokhande and Vicky Jain can be evicted from Bigg Boss 17

Bigg Boss 17 : तीन आठवड्यातच अंकिता लोखंडे व विकी जैन 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडणार, यामागचं कारणही आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.