नोएडा पोलिसांनी प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं समोर आलं आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून एल्विश यादव फरार आहे. पोलिस एफआयआरनुसार, एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असे. तसेच पार्टीत बंदी असलेले साप आणि परदेशी मुलींनाही प्रवेश मिळाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी एल्विशच्या टोळीतील ५ जणांना अटक केली आहे. (FIR Against Elvish Yadav)
नोएडा पोलिसांच्या एफआयआरनुसार, एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीमध्ये परदेशी मुलींनाही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रकरणात एल्विश यादव सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून नऊ विषारी साप जप्त करण्यात आले असणं या प्रकरणी एल्विश यादव यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस एल्विश यादवला अटक करण्याच्या मार्गावर आहेत. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस स्टेशनमधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी फिर्यादीच्या (पीएफए-अॅनिमल वेल्फेअर ऑफिसर) तक्रारीच्या आधारे, पोलिस स्टेशन सेक्टर-४९ ने नोएडा सेक्टरमध्ये असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये पार्टी केल्याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी नऊ साप आढळून आले. आता या प्रकरणाचा पुढील तपास व कारवाई सुरू आहे.
नोएडा पोलिसांच्या एफआयआरनुसार, पीएफए ऑर्गनायझेशनचे प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी सांगितले की, एल्विश यादव फार्म हाऊसमध्ये त्याच्या टोळीतील इतर सदस्यांसह सापाचे विष आणि जिवंत सापांसह व्हिडिओ शूट करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तसेच बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचं आयोजनही तो करत असे. यानंतर पीएफए ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्याने एका माहितीच्या मदतीने एल्विश यादव यांच्याशी संपर्क साधला आणि त्याला रेव्ह पार्टी आयोजित करण्यास सांगितले, त्यानंतर एल्विशने त्याच्या एका एजंटचा नंबर दिला आणि त्याचे नाव सांगून त्याच्याशी बोलण्यास सांगितले.
यानंतर, संघटनेला अडकवण्यासाठी, संघटनेने एल्विशच्या एजंट्ससह एक रेव्ह पार्टी आयोजित केली, जिथे एजंट त्यांच्या साथीदारांसह नोएडा सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमध्ये पोहोचले. येथे त्यांना नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पकडले. आरोपींकडून बाटलीतील नऊ विषारी साप आणि २० मिली सापाचे विषही जप्त करण्यात आले आहे.