हिंदी टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७’ सध्या बराच चर्चेत आहे. शोच्या पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळतं. तर काही जोड्यांमध्ये आपापसांत खटके उडाल्याचं पाहायला मिळताना दिसतं. मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन हे यंदाच्या पर्वात सहभागी झाले असून या दोघांना यंदाच्या पर्वातील ‘मास्टरमाइंड’ म्हटलं जात आहे. मात्र, आता या दोघांच्या चुकीमुळे हे दोघे ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ankita Lokhande and Vicky Jain can be evicted from Bigg Boss 17)
गेल्या आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात शोचा होस्ट सलमान खान ‘वीकेंड का वार’मध्ये स्पर्धकांचा खरपूस समाचार घेताना दिसतो. नुकताच याचा प्रोमो आला आहे. ज्यामध्ये सलमान स्पर्धकांना सुनावताना दिसतं. सुरुवातीला होस्ट ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि समर्थ जुरेलला सुनावतो. पुढे तो सगळ्या स्पर्धकांशी बोलताना म्हणतो की, “तुम्ही लोकांनी बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी ज्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली होती. त्या काँट्रॅक्टमधील सर्व अटी व शर्थी स्पष्टपणे लिहिण्यात आले होते. किती लोकांनी या घरात येऊन सर्व अटींचे पालन केले आहे?”, असा प्रश्न केला होता. तसेच “घरात येण्यापूर्वी कोणता स्पर्धक यावर कोणासह चर्चा केली आहे?”, अशी विचारणा केली.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची आई शाहरुख खानच्या ‘डंकी’मध्ये दिसणार, ट्रेलरमध्ये दिसली झलक, कोण आहे ही अभिनेत्री?
Promo #WeekendKaVaar salman angry on HMs pic.twitter.com/WoKsHupzrM
— The Khabri (@TheKhabriTweets) November 2, 2023
होस्टच्या या उत्तरावर विकीने हात वर करत मी यावर दोन दिवसांपूर्वी नील भट्टशी चर्चा केली असल्याचं सांगितलं. तेव्हा सलमान अंकिताला “तुला याबद्दल माहित होतं का?” असा विचारला असता ती म्हणाला, “या दोघांची चर्चा झाल्याचे मला या घरात आल्यानंतर कळालं.” पुढे तो थेट सना रईस खानकडे जातो आणि या काँट्रॅक्टबद्दलची एक अट सांगतो. सना यावर म्हणाली, की “मेकर्सकडे याबाबत स्पर्धकांना घराबाहेर काढून टाकण्याचा अधिकार आहे.”
हे देखील वाचा – रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे दोन मध्यांतर असणार, पण असं का?, यामागचं खरं कारण आलं समोर
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “अंकिता, नील, अभिषेक, विकी आणि ईशा इथे प्लॅनिंग करूनच आलेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढलंच पाहिजे.” तर अनेकांनी यावर बिग बॉसने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असल्याचं म्हटलं आहे. एकूणच, या प्रकारानंतर बिग बॉस आणि सलमान खान यावर काय निर्णय घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.