शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुसऱ्यांचा बंद केलेला शो आणण्यापेक्षा…”, निलेश साबळेच्या नव्या शोवरुन प्रेक्षकांना आठवलं ‘चला हवा येऊ द्या’, म्हणाले, “त्यापेक्षा ‘बिग बॉस’…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 4, 2024 | 2:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dr. Nilesh Sable's Hastay Na Hasaylach Pahije show promo netizens demanded to start Bigg Boss Marathi

"दुसऱ्यांचा बंद केलेला शो आणण्यापेक्षा...", निलेश साबळेच्या नव्या शोवरुन प्रेक्षकांना आठवलं 'चला हवा येऊ द्या', म्हणाले, "त्यापेक्षा 'बिग बॉस'..."

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारा अभिनेता व लेखक निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोने गेली १० वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. निलेश साबळेसह शोमधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अंकुर वाढवे आदी कलाकारांनी चांगलीच रंगत आणली. मात्र नुकताच या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच निलेशने नुकतीच त्याच्या नवीन कार्यक्रमाची घोषणा केली.

‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून एक्झिट घेतल्यानंतर निलेश आता “हसताय ना? हसायलाच पाहिजे” हा नवा शो घेऊन येत आहे. कलर्स मराठीवर हा नवा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या शोचा प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ”हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कॉमेडी शोमध्ये निलेश लेखन, दिग्दर्शन व सूत्रसंचालनाची जबाबदारी पाडणार आहे. ‘कलर्स मराठी’ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नवीन शोची अधिकृत घोषणा केली आहे.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटकक्षेत्रात मोठं पाऊल, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “वडिलांना अभिमान वाटेल असं…”

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या नवीन शोचे स्वागत केले असून काहींनी ‘चला हवा येऊ द्या’ची आठवण काढली आहे. तर काहींनी मात्र ‘बिग बॉस मराठी’ शो सुरु करण्याची विनंती केली आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी “चॅनल बदलतंय ना? बदलायलाच हवा कारण आम्ही तर पांचट जोकच करणार आहोत, आमच्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ हे इमोशन आहे, कलर्सवाले ‘बिग बॉस’ सुरु करायचं सोडून दुसऱ्यांनी बंद केलेला शो का आणत आहेत?, ‘चला हवा येवू द्या’ची प्रसिद्ध व अजरामर टॅगलाइन वापरताना काहीच नाही वाटत का तुम्हाला? फालतूपणा सोडा,” अशा कमेंट्स करत या शोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Video : “तापमानात घट झाली की मनस्थितीवर परिणाम…”, बर्फामध्ये बायको गाणं गात नाचताना सुबोध भावेने शूट केला व्हिडीओ, म्हणाला, “हा पुरावा…”

तर काहींनी मात्र ‘बिग बॉस’ मराठी सुरु करण्याबद्दल सुर आळवला आहे. “कृपया ‘बिग बॉस’ मराठी चालू करा, आम्हाला ‘बिग बॉस’ मराठी पाहिजे आहे, आम्हाला बिग बॉस हवं आहे, हे नाही” अशा अनेक कमेंट्सद्वारे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांनी ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच, अनेकांनी “एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के, खुप शुभेच्छा” असं म्हणत या नवीन शोला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान,  ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा शो कलर्स मराठीवर येत्या २० एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. 

Tags: Dr. Nilesh SableHastay na? Hasaylach Pahijemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
actor nitish bhardwaj daughter

पहिलं लग्न १४ वर्षांनी तर दुसरं लग्न १० वर्षांनी मोडलं, आता तिसऱ्या लग्न करणार 'महाभारत' फेम नितीश भारद्वाज?, म्हणाले, "माझ्या मुलींना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.