नाटक, मालिका व चित्रपट मनोरंजनाच्या या तीनही माध्यमांत अभिनयाची मुशाफिरी करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता उत्तम दिग्दर्शकदेखील आहे. आपल्या अभिनय व दिग्दर्शनाने चर्चेत राहणारा सुबोध हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेता सध्या त्याच्या व्यस्ततेतून वेळ काढत कुटुंबियांबरोबर फिरायला गेला आहे. भावे कुटुंब सहपरिवार काश्मीर दौऱ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. या दौऱ्याचे काही खास फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. सुबोधने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची पत्नी आणि दोन मुलं दिसत आहेत. सुबोधची दोन्ही मुलं कान्हा व मल्हारही या फोटोंमध्ये धमाल, मजामस्ती करताना दिसत आहेत. अशातच सुबोधची पत्नी मंजिरीचा एक धमाल व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये तीही मजामस्ती करताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्…”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी…”
सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मंजिरीचा धमाल व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये ती बर्फामध्ये मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. मंजिरी भावे या व्हिडीओमध्ये बर्फामध्ये नाचत नाचात “में चली बन के हवा” हे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील आशा भोसले यांनी गायलेलं गाणं गात आहे. या खास व्हिडीओला सुबोधने “तापमानात घट झाली की त्याचा परिणाम मनस्थितीवर होतो त्याचा हा पुरावा” असं मजेशीर कॅप्शनदेखील दिलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सुबोधही पत्नीसह एन्जॉय करताना दिसत आहे.
दरम्यान, सुबोधने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांसह अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक कलाकार मंडळींनीदेखील या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. श्रुती मराठे, बेला शेंडे, अभिज्ञा भावे, रश्मी अनपट, सुकन्या मोने, गुरु दिवेकर आदी कलाकारांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.