‘महाभारत’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेतील सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे ‘कृष्ण’. या भूमिकेला प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले. ही भूमिका साकरणारे नितीश भारद्वाज यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. पण व्यावसायिक आयुष्यात त्यांनी नाव कमावलं असलं तरीही खासगी आयुष्यात मात्र त्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नितीश यांचं घटस्फोटाच्या चर्चा खूप अधिक प्रमाणात सुरु होत्या. घटस्फोट घेण्यासाठी त्यांनी न्यायालात केसही फाइल केली होती. पण यामध्ये त्यांच्या मुलींपासून दूर होण्याचे दु:ख त्यांना नेहमी सतावत असते. अशातच त्यांच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. (actor nitish bhardwaj daughter)
नितीश यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीविरोधात मानसिक छळ केल्याचे आरोप केले होते. तसेच या सर्वाचा त्यांच्या मुलींनादेखील भोगावा लागला आहे. कौटुंबिक भांडणामुळे मुलींना माझ्यापासून दूर केले. त्यांना दूर करण्याच्या नादामध्ये सर्व ठिकाणी हलवले गेले. मात्र याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मुलाखतींदरम्यान त्यांनी आपले दु:ख सर्वांसमोर व्यक्त केले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांनी दु:ख बोलून दाखवले आहे. त्यांना विचारले गेले की, “तुम्ही दुसऱ्यांदा लग्न कराल का?”, त्यावर त्यांनी सांगितले की, “या लग्नामुळे मला खूप दु:ख झाले आहे. माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून दूर गेल्या आहेत. माझ्या मुलींना मला बाबा म्हणायची लाज वाटते असे माझी ११ वर्षाच्या माझ्या मुली म्हणाल्या”.
तसेच पुढे ते म्हणाले की, “त्यांच्यासाठी मी इतके करुनदेखील माझ्याबरोबर त्या असं का वागत आहेत. त्यांच्यावर आई-वाडिलांचं वेगळं होणं त्यांना सहन न झाल्यामुळेही असेल. पण या सगळ्यातून मी बाहेर कसं पडू हे मला समजत नाही आहे”.
पुढे ते म्हणाले की, “माझ्यावर पैसे मागीतल्याचेदेखील आरोप केले गेले. पण हे सगळं खोटं आहे. माझ्याकडून खोटं बोलून घेतलेले पैसेच मी परत मागितले. माझ्याबरोबर फसवणूक झाली आहे. मी आजही माझ्या मुलींसाठी न्यायालयात लढत आहे. त्यामुळे आता मी इतर महिलांबरोबर कसे वागेन हे मला आता सांगता येणार नाही. मला लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मी आतापर्यंत अनेक लग्न यशस्वी होताना पहिली आहेत”.
दरम्यान नितीश कौटुंबिक कलहामुळे पूर्णतः खचलेले दिसून येतात. सध्या हे मालिकाविश्वापासूनही खूप दूर आहेत. लवकरच ते चांगल्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतील अशी अपेक्षा सर्वांना आहे.