येत्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहर चाहत्यांसाठी एक खास सरप्राइज घेऊन येत आहे. करण जोहर ‘लव्ह स्टोरीया’ नावाची नवी सीरिज घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये देशभरातील खऱ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. या वास्तविक जीवनावर आधारित प्रेमकथा असतील. या चित्रपटांच्या सीरिजमध्ये ६ उत्कृष्ट प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत. ज्या सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या आहेत.
करण जोहरच्या ‘लव्ह स्टोरीयां’ या सीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सहा वेगवेगळे कथा दाखवण्यात येणार आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल व विवेक सोनी या दिग्दर्शकांच्या कथा या सीरिजमध्ये असणार आहेत. या सीरिजचा कार्यकारी निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता व सोमेन मिश्रा हे आहेत.
आणखी वाचा – ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा, ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही पसंती
करण जोहरने नुकतेच त्याच्या सोशल मीडियाद्वारे त्याच्या ‘लव्ह स्टोरीयां’ या सीरिजचे पोस्टर शेअर केलं असून या पोस्टरखाली “भारत भर से सच्ची मोहब्बत की सच्ची कहानियाँ. इस वैलेंटाइन पर आपके लिए आ रही हैं!” असं कॅप्शनही करणने दिलं आहे. करणने शेअर केलेल्या या पोस्टरला चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘लव्ह स्टोरीयां’ ही सीरिज येत्या व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनेक ओटीटी प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.