प्रत्येक घराची गोष्ट असते. प्रत्येक घराचा एक वेगळा प्रवास असतो. स्वतःच घर घेणं हे प्रत्येक सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींचंही स्वप्न असतं. सरत्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःच, हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. बऱ्याच मराठी सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. चाहते या कलाकारांच्या घराबद्दल, त्याच घर पाहण्यासाठी उत्सुक असतात. तर बरेचदा काही कलाकार त्यांचं घर स्वतःहून चाहत्यांसह शेअर करतात तर काहीवेळा कलाकार मंडळी घर दाखवण्यास विरोध करतात. (Aishwarya Narkar Home)
अशातच एका मराठमोळ्या व लोकप्रिय अभिनेत्रीच्या घराची झलक समोर आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. सोशल मीडियावरुन विविध रील, डान्स व्हिडीओ शेअर करत दोघेही चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या या रील व्हिडीओला चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. अशातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. “स्वीट होम” असं कॅप्शन देत त्यांनी त्यांच्या सुंदर अशा घराची झलक शेअर केली आहे. शांत दुपार असं म्हणत त्यांनी दाखवलेली घराची झलक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. खूप सुंदर इंटेरियर, झाडांनी सजवलेली खिडकी, घरातील पाळणा अशा सुंदर सजावटीने त्यांचं हे घर अधिक शोभून दिसत आहे. दुपारच्या निरागस शांततेत घरही किती निरागस दिसतं हे त्यांनी या व्हिडीओमधून दाखवलं आहे. यावेळी ऐश्वर्या नारकर यांच्या घरच्या सजावटीनेच साऱ्यांचं लक्ष मोहून घेतलं.
ऐश्वर्या नारकर यांच्या घराचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे. एका चाहतीने कमेंट करत, “तुम्ही ज्या पद्धतीने घर सजवता त्यात तुमचे पारंपरिक प्रेम व तुमचा अनोखा साधेपणा दिसतोय” असं म्हंटल आहे. तर आणखी एकाने, “खूप सुंदर घर” असं म्हणत त्यांच्या घराचे कौतुक केले आहे.