बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्ताने करण जोहरची ओटीटी प्रेक्षकांसाठी खास भेट, वेबसीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांच्या प्रेमकथा अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2024 | 2:59 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Director and producer karan johar new webseries love storiyaan stream on valentine day amazon prime ott platform

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्ताने करण जोहरची ओटीटी प्रेक्षकांसाठी खास भेट, वेबसीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांच्या प्रेमकथा अन्...

येत्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहर चाहत्यांसाठी एक खास सरप्राइज घेऊन येत आहे. करण जोहर ‘लव्ह स्टोरीया’ नावाची नवी सीरिज घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये देशभरातील खऱ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. या वास्तविक जीवनावर आधारित प्रेमकथा असतील. या चित्रपटांच्या सीरिजमध्ये ६ उत्कृष्ट प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत. ज्या सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या आहेत.

करण जोहरच्या ‘लव्ह स्टोरीयां’ या सीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सहा वेगवेगळे कथा दाखवण्यात येणार आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल व विवेक सोनी या दिग्दर्शकांच्या कथा या सीरिजमध्ये असणार आहेत. या सीरिजचा कार्यकारी निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता व सोमेन मिश्रा हे आहेत.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा, ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही पसंती

करण जोहरने नुकतेच त्याच्या सोशल मीडियाद्वारे त्याच्या ‘लव्ह स्टोरीयां’ या सीरिजचे पोस्टर शेअर केलं असून या पोस्टरखाली “भारत भर से सच्ची मोहब्बत की सच्ची कहानियाँ. इस वैलेंटाइन पर आपके लिए आ रही हैं!” असं कॅप्शनही करणने दिलं आहे. करणने शेअर केलेल्या या पोस्टरला चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : परळच्या एम.डी. कॉलेजमध्येच घेतलं दोघांनी शिक्षण, आता नवऱ्यासह तिथेच पोहोचली दीपा परब, कट्ट्यावर बसले अन्…

दरम्यान, ‘लव्ह स्टोरीयां’ ही सीरिज येत्या व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनेक ओटीटी प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.   

Tags: Bollywood directorentertainment newskaran joharlove storiyaanOTT Entertainmentott entertainment newsott webseriesओटीटी मनोरंजनओटीटी वेबसीरिजकरण जोहरबॉलिवूड दिग्दर्शकमनोरंजन बातमीलव्ह स्टोरीयां
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
aishwarya narkar home

Video : इतकं प्रशस्त आणि मोठं आहे ऐश्वर्या नारकरांचं घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक, 'त्या' गोष्टीने वेधलं सर्वाधिक लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.