गेला अनेक काळ टीआरपी च्या शर्यतीत अवलं ठरलेली स्टार प्रवाह वरील मालिका म्हणजे रंग माझा वेगळा.या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा मिळवली आहे.दीपा-कार्तिक यांच्या संसारातील चढ उतार या मालिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या दोन्ही मुली हा मोठा दुवा आहेत.आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्या साठी त्यांनी कायमच प्रयत्न केले आहेत.(Tanishka Vishe New Look)
सध्या मालिकेचे कथानक १४ वर्ष पुढे गेले आहे. मोठ्या कार्तिकी आणि दीपिकाच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि अभिनेत्री तनिष्का विषे बघायला मिळतेय.लहान कार्तिकी, दीपिकाला जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम आताच्या कार्तिकी दीपिकाला देखील मिळतंय, त्यांच्या आताच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.वडील तुरुंगात जाण्यासाठी आपली आई जबादार आहे असा गैरसमज असल्यामुळे कार्तिकी कायम तिच्या आईच्या विरोधात असते. तर या उलट दीपिका खूपच समजूतदार आणि शांत आहे. ती कायम तिच्या आईच्या पाठीशी खंबीरपने उभी असल्याचं बघायला मिळते. तर दीपा आणि कार्तिकच नातं सध्या वेगळ्या वळणावर आहे. ते बघणं प्रेक्षनकांसाठी रंजक ठरतंय.
पहा दीपिकाचा बोल्ड लुक (Tanishka Vishe New Look)
दीपिका म्हणजेच तनिष्का, मालिकेतील आताच्या लुक मध्ये खूपच सिम्पल आणि डिसेन्ट दिसते. परंतु पडद्या मागे मात्र तनिष्का वेगवेगळे लूक्स ट्राय करत असते. ट्रेडिशनल व्यतिरिक्त ग्लॅमर्स आणि बोल्ड फोटोशूट देखील तनिष्का करते आणि तिच्या सोशलमीडिया वरून ते फोटोज ती वेळोवेळी शेअर करत असते. आणि तिचे हे लूक्स देखील प्रेक्षकांना तितकेच आवडतात.तिच्या या पोस्ट्स वर प्रेक्षक भरभरून लाईक आणि कमेंट्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. (Tanishka Vishe New Look)
तसेच या आधी तनिष्का कलर्स मराठी वरील सुखी माणसाचा सादर या मालिकेत पाहायला मिळाली होती.त्यात तिने मैना ही भूमिका साकारली होती.त्याच प्रमाने सोनी मराठी वरील कुसुम या मालीकेत रुपाली म्हणून तनिष्का पाहायला मिळाली होती. तसेच ती तिच्या इंस्टाग्राम अकांऊट वरून वेगळंवेगळे डान्स व्हिडिओ देखील शेअर करत असते. तिचा हा निरागस अंदाज प्रेक्षकांच्या मनाला भावतो.