स्टार प्रवाह या वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांना आवडत असून या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांचं चांगलाच मनोरंजन करताना दिसतात. तसेच या वाहिनीवरील “रंग माझा वेगळा” ही मालिका देखील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.या मालिकेत दीपा आणि कार्तिक च्या लाग्नापासून ते सौंदर्या दीपाचा स्वीकार करे पर्यंत पेक्षकांना फार उत्सुकता लागली होती. आता मालिकेच्या कथानकानुसार मालिकेत कार्तिक नुकताच जेलमधून परत घरी आलाय आणि तो जितकी वर्षे जेल मध्ये राहिलाय तितक्या वर्षांचा बदला त्याला दीपा सोबत घ्याचा असल्याची वासना मनात ठेवून तो घरी परतलाय. (Rang Maza Vegla Update)
मालिकेत दाखवण्यात आल्याप्रमाणे दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु आपल्या बाबाला जेल मध्ये पाठवल्यामुळे कार्तिकी आई दीपावर कायम नाराज असल्याचं दिसतेय. कार्तिकीला आर्यन नावाचा बॉयफ्रेड असून घरात अद्याप याबद्दल कोणालाच काही माहित नाही आहे.
हे देखील वाचा: “विराट कोहली”‘नम्रताचा ‘या’ फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट
मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कार्तिकी तिचा मोबाईल चार्जिंगला लावून खोलीतून बाहेर जाते तेवढ्यात दीपा तिच्या खोलीत येते आणि तिच्या मोबाईलवर आर्यनचा कॉल आल्याचं बघते आणि तो कॉल ती उचलते. त्यानंतर ती खाली जाते आणि कार्तिकीला सांगते तुझ्या मोबाईलवर आर्यन नावाच्या मुलाचा फोन आला होता. हे ऐकून कार्तिकी दीपावर खूप चिढते. तिला नको ते बोलते त्यानंतर दीपा ला हे सगळं सहन न झाल्यामुळे दीपा तिच्या खानाखाली वाजवून तिथून निघून जाते. कार्तिकला मात्र मनापासून खुश होतो परंतु तो दीपाला समजवण्याचं नाटक करतो. (Rang Maza Vegla Update)
त्यानंतर एकीकडे सौदर्या कार्तिकीवर चिढलेली असते. तू कायम दीपाचा द्वेष का करत असते, असं तिला विचारते हे सगळं कार्तिक ऐकत असतो त्यावर कार्तिक सौंदर्याला समजवतो.
आता मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत रात्रीच्या वेळी कार्तिकीला आर्यन तिच्या गार्डन मध्ये भेटायला आलेला असतो. तर आता कार्तिकी आणि आर्यन ची भेट होईल का? त्यांना भेटताना घरचे पाहणार तर नाहीना हे पाहून रंजक ठरणार आहे.