क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या महिन्यात २२ डिसेंबरला युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली. कोरोनाच्या काळात २०२० मध्ये दोघांनी लग्न केले. युजवेंद्र चहलचे धनश्रीबरोबर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. दोघे एकमेकांबरोबरचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. मात्र, आता त्यांच्या नात्याबद्दलच्या विविध चर्चा सुरु आहेत. या दरम्यान धनश्रीचे नाव प्रतीक उतेकरबरोबर जोडले जाऊ लागले. मात्र याबद्दल धनश्री अद्याप काहीही भाष्य केले नाही. याबरोबरच युजवेंद्र आरजे महवशला डेट करत असल्याच्या चर्चादेखील रंगल्या. (rj mahvash on affairs with yuzvendra chahal)
युजवेंद्रशी आरजेचं महवशचं नाव जोडलं गेलं त्याबद्दल आता आरजेने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने लिहिले की, “काही आर्टिकल व इंटरनेटवर अनेक चर्चा सुरु आहेत. पण या अफवा कीती हास्यास्पद आणि बिनबुडाच्या आहेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर दिसलात म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला डेट करत आहात असं का? मला माफ करा. पण हे कोणतं वर्ष आहे? तुम्ही सगळे किती जणांना डेट करत आहात? मी दोन- तीन दिवस हे बघत आहे. पण मी कोणत्याही टीमला दुसऱ्याची प्रतिमा सांभाळावी म्हणून माझं नाव मध्ये आणू देणार नाही. कठीण काळात लोकांना, मित्रांना व कुटुंबाला शांततेत राहुदे”.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सोशल मीडियावर लोक धनश्रीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत होते. तिचे नाव कोरिओग्राफर प्रतीक उतेकरबरोबर जोडले जात होते. अशा परिस्थितीत आता धनश्रीने घटस्फोटाच्या बातमीत तथ्य आहे की नाही याबाबत काहीही सांगितले नसले तरी सर्वांनाच उत्तर दिले आहे.
जेव्हा पापाराझींनी युजवेंद्रला हॉटेलच्या बाहेर या मिस्ट्री गर्लबरोबर पाहिले तेव्हा क्रिकेटरने आपला चेहरा लपवला. त्यामुळे घटस्फोटादरम्यान क्रिकेटर असा स्पॉट होताच चाहत्यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२३ पासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. २०२३ मध्ये, धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले होते ज्यामुळे तिच्या क्रिकेटरबरोबरच्या घटस्फोटाची बातमी आली होती. मात्र नंतर चहलने या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हणत पूर्णविराम दिला होता.