Nivedita Saraf Birthday Celebration : ‘स्टार प्रवाह’ वाहिनी नेहमीच काही ना काही आशयघन विषय घेऊन अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणत असते. यांत भर घालत काही दिवसांपूर्वीच ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका भेटीला आणली. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे रहातात. प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका देखील अशाच एका जोडप्याभोवती फिरते ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. या मालिकेत मराठी सिनेविश्वातील दोन दिग्गज कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम मुख्य भूमिकेत आहेत. निवेदिता यांनी आजवर अनेक मराठी मालिका, नाटक, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अगदी नव्वदीच्या काळ गाजवलेला असताना ही अभिनेत्री नेहमीच तिच्या अभिनयाने चर्चेत राहिली. इतकंच नव्हे तर अनेक मालिकांमधूनही निवेदिता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता सध्या निवेदिता या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. नुकताच निवेदिता यांचा वाढदिवस झाला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या टीमनेही त्यांचा वाढदिवस सेटवर दणक्यात साजरा केला आहे. निवेदिता यायच्या आधीच मालिकेतील सहकलाकारांनी त्यांची मेकअप रुम सजवलेली होती. त्या येताच त्यांनी दरवाजा उघडला तर त्यांना खूप मोठं सरप्राइज मिळालं. हे पाहून निवेदिता यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. फुग्यांचा सजावटीने त्यांची ही मेकअप रुम सजवण्यात आली होती.
आणखी वाचा – जिममध्ये रश्मिका मंदानाला दुखापात, सलमान खानसह ‘सिकंदर’चं शूट करताना घडली घटना, आता नेमकी परिस्थिती कशी?
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत प्रतीक्षा जाधव, हरीश दुधाडे, पालवी कदम ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आता मालिकेत नवनवीन वळण यायला सुरुवात झाली आहे. मालिकेत पुढे आणखी कोणते रंजक ट्विस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.