स्टार प्रवाहवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम अग्रेसर असणारी मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका. नवनवीन ट्विस्टने चर्चेत राहणारी ही मालिका नुकतीच एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेतून घेतलेला निरोप. मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना आणि टीआरपीमध्येही मालिका हिट होत असताना तेजश्रीने अचानक मालिका का सोडली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यानंतर आता अभिनेत्री स्वरदा थिगळे ही मुक्ताची भूमिका साकारणार आहे. स्वरादाने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचे शूटिंग सुरु केल्याचे सोशल मीडिया स्टोरी मधून कळवले. (swarda thigale reaction on comparison)
प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता तेजश्री ऐवजी स्वरदा ठिगळे नवीन मुक्ता साकारणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये साहजिकच नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अनेकांना नवीन मुक्ताच्या भूमिकेत पाहणे कठीण जात आहे. त्यामुळे चाहते याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे अनेक जण याबद्दल त्यांच्या समिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच ‘मराठी सीरियल ऑफिशियल’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर स्वरदा ठिगळेची पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत असं म्हटलं की, “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांची बऱ्याचदा तुलना होते आणि तिरस्कार सहन करावा लागतो”.

यावर त्या इन्स्टाग्राम पेजने प्रत्युत्तर दिलं आहे की, “हे खरं आहे. अगदी खरं आहे. पण ते त्यांचं काम करत आहेत. तुलना होणारच आहे. पण एक उदाहरण, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची रिप्लेसमेंट चांगली होती. रुपाली सगळ्यांना आवडली. तर बघूयात आता ‘प्रेमाची गोष्ट’चं काय होत आहे?” हीच स्टोरी स्वरदाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे आणि असं म्हटलं आहे की, “ “आजही कलेचे असे खरेखुरे चाहते आहेत म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार”.
आणखी वाचा – बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”
दरम्यान, आता स्वरदा तेजश्रीची जागा घेऊन तिच्यासारखंच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार का? यामध्ये तिला कितपत यश मिळेल? हे आगामी दिवसांत पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने याआधी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘वेलकम होम’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.