मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. ऐन दिवाळीत अमृताची स्वप्नपूर्ती झाली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. “अनेक वर्षांपासूनचं स्वप्न सत्यात उतरलं”, असं म्हणत अमृता खानविलकरने मुंबईत आलिशान घर खरेदी केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. टोलेजंग इमारतीच्या २२ व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे. या नवीन घर खरेदी केल्याचा व्हिडीओ तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र तेव्हा अभिनेत्रीच्या घराचे काम सुरु होते. अशातच आता तिच्या नवीन घराचा व्हिडीओ समोर आला आहे. (amruta khanvilkar on netizen comment)
या व्हिडीओसह अमृताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली तिने कॅप्शन लिहीत तिने असं म्हटलं आहे की, “नव्या वर्षाची नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं “एकम”. “एकम” म्हणजे एक – जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ”. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच नवीन घरानिमित्त तिला अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा – बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”
मात्र या व्हिडीओखालील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओखाली एका महिलेने अमृताला “सगळं एकटी एकटी करत आहेस. मग नवरा फक्त बोलण्यामधे असतो का? तो आजूबाजूला कधी दिसतही नाही”. असं म्हटलं आहे. यावर अमृताने तिला कमेंट करत उत्तर दिलं आहे. अमृताने या महिलेच्या कमेंटवर उत्तर देत असं म्हटलं आहे की, “अहो टीझर बघून पिक्चरचा अंदाज लावू नका. जाऊन पूर्ण व्हिडीओ बघा”.

दरम्यान, अमृताने दिवाळीत नवीन घराचे स्वप्न साकार झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. या घरात प्रवेश केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. या नावेने व्हिडीओवर तिला अनेक कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, सावनी रवींद्र, सोनाली खरे, मधुगंधा कुलकर्णी, विजू माने यांसारख्या अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिचं कौतुकही केलं आहे