प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण ही गर्भवती आहे. तिच्याअ गरोदरपणाची बातमी कळताच तिच्या चहात्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. येत्या सप्टेंबर महिन्यात ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या आई होण्याच्या खास क्षणांचा आनंद उपभोगत आहे आणि यात तिला तिचा साथीदार म्हणजेच तिचा नवरा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह उत्तम साथ देत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका व रणवीर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांचा हात धरत चालताना दिसले. या खास प्रसंगी रणवीर पत्नी दीपिकाची पूर्ण काळजी घेताना दिसला.
अशातच अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बम्प दिसत आहे. दीपिका नुकतीच तिच्या आईबरोबर डिनरसाठी गेली होती. यावेळी ती तिच्या आईसह स्पॉट झाली. दीपिका तिची आई उज्जला पदुकोणबरोबर डिनर डेटसाठी गेली होती. यावेळी दीपिकाच्या लुकने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. दीपिकाने काळ्या रंगाच्या वनपीस ड्रेसवर डेनिम जॅकेट परिधान केला होता. तर या लुकला साजेसे पांढऱ्या रंगाचे शूजही घातले होते.
दीपिका पदूकोणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओमधील एका आणखी व्यक्तीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ही व्यक्ती म्हणजे दीपिका पदूकोणची मदतनीस. दीपिकाच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी दिसत आहे. तसेच व्हायरल व्हिडीओमध्ये ती दीपिकाची बॅग धरतानाचेही पाहायला मिळत आहे. अर्थात ही मुलगी अगदीच लहान दिसत असून ही नक्की दीपिकाची मदतनीस आहे की आणखी कोण?याविषयी कळू शकलेले नाही. मात्र अनेकांनी ती दीपिकाची मदतनीस असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका लवकरच प्रभास, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानीबरोबर ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ मध्येदेखील आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, अक्षय कुमार, अर्जुन कपूर आदी कलाकारही आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित होत आहे.