मंगळवार, एप्रिल 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भाचीची ‘आई कुठे…’ मालिकेमध्ये दमदार एन्ट्री, चिमुकलीला टीव्हीवर पाहून भारावली, म्हणाली, “माझी भाची…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 1, 2024 | 4:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress Vishakha Subhedar shared video of her niece she acted in the Aai Kuthe Kay Karte serial

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भाचीची 'आई कुठे...' मालिकेमध्ये दमदार एन्ट्री, चिमुकलीला टीव्हीवर पाहून भारावली, म्हणाली, "माझी भाची..."

आजही एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादे लहान मुल टीव्हीवर दिसले तरी अनेकजण त्याचे कौतुक करतात. अनेकांसाठी आपल्या कुटुंबातील एखादा लहान मुलगा, मुलगी टीव्हीवर दिसले तर त्यांच्यासाठी ही अभिमानासह आनंदाची बाब असते. असाच आनंद झाला आहे मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना. विशाखा सुभेदार या सध्याच्या घडीच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक  मालिका व चित्रपटांमधून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र त्यांच्या विनोदी भूमिकांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या विशाखा सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अशातच विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा खास व्हिडीओ त्यांच्या भाचीचा आहे. भाचीला पहिल्यांदाच टीव्हीवर पाहिल्यानंतरचा आनंद त्यांनी या व्हिडीओमधून व्यक्त केला आहे. विशाखा यांच्या भाचीने नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली असून या मालिकेतील तिच्या भमिकेचे विशाखा यांनी कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – Video : प्रसाद जवादेने बायकोसाठी बनवला खास पदार्थ, रेसिपीही दाखवली, घरातलं किचन आहे इतकं स्वच्छ व मस्त, व्हिडीओ पाहाच

विशाखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या ‘राधा’ या भाचीचा ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील सीनचा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओखाली त्यांनी “राधा. ‘आई कुठे काय करते’ माझी भाच्ची. आमची बाहुली” असं म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडीओखाली विशाखा यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : घोडबंदर रोडवरुन शूटला जात असताना मराठी कलाकारांचे हाल, गाड्या दोन-दोन तास एका जागी उभ्या अन्…; अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsvishakha subhedar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Gayatri Datar Wedding
Entertainment

Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर

एप्रिल 27, 2026 | 2:34 pm
Rohan Gujar Twins Baby
Entertainment

‘होणार सून मी…’ फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…

एप्रिल 27, 2026 | 12:12 pm
Riteish Deshmukh to Bageshwar Baba
Entertainment

छत्रपती शिवाजी महाराजांबत चुकीचं वक्तव्य करणं बागेश्वर बाबांना पडलं महागात, अभिनेता भडकला

एप्रिल 27, 2026 | 11:11 am
Next Post
Ankita Lokhande shared pavitra rishta memories

"सुशांतची साथ नसती तर…", 'पवित्रा रिश्ता'ला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंकिता लोखंडेला आठवला सुशांत सिंह राजपूत, म्हणाली, "त्यानेच अभिनय शिकवला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.