‘बिग बॉस १७’ हा रिॲलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारूकी. मुनव्वर एक स्टँड-अप कॉमेडियन व एका रिॲलिटी शोचा विजेता आहे. या कार्यक्रमात त्याला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. या कार्यक्रमात त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलासा झाला. त्यात त्याच्या विभक्त पत्नी व गर्लफ्रेंडबद्दल कळताच बरीच चर्चा सुरु झाली होती. नुकताच त्याने शोमध्ये त्याच्या पत्नीविषयी व त्याच्या संघर्षाबद्दल वक्तव्य केलं. त्याने हा ही खुलासा केली की त्याच्या पत्नीने त्याला न सांगता दुसरं लग्न केलं होतं. (munawar farooqui shared about his personal life)
सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागात मुनव्वरने त्याच्या दिवंगत आई, पत्नी व मुलाबाबत वक्तव्य करत भावनिक झाला. मुनव्वरने ऐश्वर्या, अरुण व मन्नारा यांच्याबरोबर बोलताना सांगितलं की, “मी १४ वर्षांचा असताना माझी आई मला सोडून गेली. तेव्हा माझ्या आत्याने मला सांगितलं की तुझं आता इथे काही नाही. आणि मग माझ्या वडिलांना व मला मुंबईत बोलवून घेतलं. मुंबईत आल्यानंतर मी भिंडी बाजारात एका भांड्याच्या दुकानात कामाला लागलो. तिथे मला रोज ६० रुपये मिळायचे. त्यामुळे मी खूप आनंदी व्हायचो”.
यावर त्याला ऐश्वर्याने विचारलं की, “तुझं लग्न कोणी करुन दिलं?” यावर मुनव्वर म्हणाला, “माझं लग्न घरच्यांनी करुन दिली होती”. यावर ऐश्वर्याने त्याचं लग्न का चाललं नाही असा प्रश्न केला. त्यावर स्पष्ट करताना तो म्हणाला, “मी इथे ते नाही सांगू शकत. पण माझं लग्न चाललं नाही”. त्यानंतर ऐश्वर्याने त्याला विचारलं की “तुझ्या लग्नाच्या एका वर्षानंतरच तुला मुलगा झाला का?”. आता ती मुलगी सेट झाली का? यावर मुनव्वर म्हणाला, “तिचं लग्न झालं. मला माहितही नव्हतं. मी माझा मुलाला मिकाइलला १०-१५ मिनीटांसाठी स्वतःकडे बोलवून घ्यायचो. तसंच मिकाइल माझ्याकडे आला. त्यानंतर मला कळलं की तिने लग्न केलं आहे. मी तिला फोन करुन विचारलं की हे खरं आहे का? त्यावर ती ‘हो’ म्हणाली. त्यानंतर मला कळून चुकलं की मिकाइल माझ्याकडे पाठवून तिने दुसरं लग्न केलं आणि मग ती दुसऱ्या शहरात निघून गेली”.

ऐश्वर्याने जेव्हा विचारलं की “मुलाला सोडताना तिला वाईट वाटलं नाही का?” त्यावर मुनाव्वर म्हणाला, “कोणालाही त्याच्या स्वतःच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याने काय पाऊलं उचललं यावर टिप्पणी करु नका. आमचा मुलगा त्याच्या आईबरोबर जास्त कनेक्टेड नव्हता”. मुनव्वरने २०१७मध्ये अरेंज मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांना २०१८मध्ये मुलगा झाला. त्यानंतर काही काळानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांचा २०२२मध्ये घटस्फोट झाला. २०२१पासून मुनव्वर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नाजिला सताइशीला डेट करत आहे.